vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भारतातील टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष, उद्योगपती  रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

पहिला उद्योगरत्न पुरस्कार उद्योगपती रतन टाटा यांना प्रदान….

 

मुंबई प्रतिनिधी

भारतातील टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष, उद्योगपती  रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. टाटा यांच्या मुंबईतील हालकाई बंगल्यात अत्यंत साधेपणाने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते.

भारतातील टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष, उद्योगपती  रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. टाटा यांच्या मुंबईतील हालकाई बंगल्यात अत्यंत साधेपणाने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला

याप्रसंगी रतन टाटा यांचे शाल पुष्पगुच्छ, उद्योगरत्न पुरस्कारानचे सन्मानचिन्ह तसेच 25 लाख रुपयांचा धनादेश आणि खास तयार करण्यात आलेले रतन टाटा यांचे पोट्रेट त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले आहे

उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी टाटा यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले.

यावेळी (Mumbai) उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि मित्रा या राज्य शासनाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष टी. चंद्रशेखर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

तेव्हा आम्ही पूरग्रस्तांना तातडीनं मदत केली होती, हे सरकार का करत नाही…? विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस 

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर येथे अंबाबाई मंदिरात मध्ये घटस्थापनेची विधी झाल्यावर देण्यात आली तोफेची सलामी

vishwatmaklokswamivarta

भाजपच्या राजकारणापासून सावध राहा : बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय अध्यक्ष  मायावती

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी दरमहा ५०हजार रुपये देण्याचे उपमुख्यमंत्री यांचे आदेश !मंदिरासह सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसराचा विकास करण्याची मागणी!

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या अलिबाग येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु