vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचे दोन फलंदाज श्रेयस अय्यर आणि केएल राहुल पुनरागमनासाठी सज्ज …..

आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचे दोन फलंदाज श्रेयस अय्यर आणि केएल राहुल पुनरागमनासाठी सज्ज …..

 

क्रिकेट प्रतिनिधी

आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचे दोन फलंदाज श्रेयस अय्यर आणि केएल राहुल पुनरागमनासाठी सज्ज आहेत. दोन्ही खेळाडू एनसीएमध्ये कसून सराव करत आहेत.

आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी भारतीय क्रिकेट संघाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. आशिया कपसाठी संघाची निवड काही दिवसांत होणार आहे. आशिया चषकासाठी संघाच्या निवडीबरोबरच विश्वचषक स्पर्धेसाठीचा संभाव्य संघही जवळपास निश्चित होणार आहे. अशा परिस्थितीत, पुढील काळ निवडकर्त्यांसाठी खूप आव्हानात्मक असणार आहे, कारण दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करण्यासाठी अनेक खेळाडू तयार आहेत. या खेळाडूंमध्ये केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांची नावे आघाडीवर आहेत.

केएल राहुल राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये परिस्थितीनुसार सराव करताना दिसला आहे. यादरम्यान राहुलने बराच वेळ फलंदाजी आणि यष्टीरक्षणाचा सराव केला. अशा स्थितीत आशिया चषकात राहुलची निवड जवळपास निश्चित आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यरही दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. अय्यरही एनसीएमध्ये असून त्याने फलंदाजीचाही भरपूर सराव केला.

 

अशा परिस्थितीत आता एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की केएल राहुल आणि श्रेयस अय्यर संघात परतल्यानंतर त्यांच्या जागी कोणत्या खेळाडूंना डच्चू मिळेल?

आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचे दोन फलंदाज श्रेयस अय्यर आणि केएल राहुल पुनरागमनासाठी सज्ज …..

संबंधित पोस्ट

गुणवंत खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान आणि शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनात सहयोग देणाऱ्या संस्थांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

13 जानेवारीपासून सुरू होणार हॉकी विश्वचषकाला सुरुवात…

उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘मास्टर स्ट्रोक’ मराठी पाक्षिकाचे प्रकाशन,चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

ICCआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी जय शहा नियुक्त,आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नामांकन मिळाल्याने मी नम्र झालो.

vishwatmaklokswamivarta

खेलोइंडिया युवा स्पर्धेतील कामगिरीने महाराष्ट्राचे क्रीडा क्षेत्रात एक पाऊल पुढे पडले आहे. भविष्यातही महाराष्ट्राचे खेळाडू अशीच चमकदार कामगिरी करतील आणि ऑलिम्पिक स्पर्धेतील आपला टक्का वाढवतील. उत्तमोत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्र सरकार खेळाडूंच्या सतत पाठिशी उभे राहील- क्रीडामंत्री गिरीष महाजन

vishwatmaklokswamivarta

महिला आशिया चषक 2024: भारताचा नेपाळवर 82 धावांनी विजय…