vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लातूरकरांचा अनोखा उपक्रम:वसुंधरा प्रतिष्ठान सर्व निसर्ग प्रेमी चे श्रमदान 🌱 551 रोपांची लागवड  उर्जादायी अन प्रेरणादायी उपक्रम….

 लातूरकरांचा अनोखा उपक्रम:वसुंधरा प्रतिष्ठान सर्व निसर्ग प्रेमी चे श्रमदान 🌱 551 रोपांची लागवड  उर्जादायी अन प्रेरणादायी उपक्रम….

लातूर प्रतिनिधी

🌱 *सहा तासांचे श्रमदान… वनभोजन आ🌱 *सकाळी 8 वाजता ५४ जणांचा समावेश असणारी वसुंधरा टीम लातूरवरून कंधारला निघाली, 11 वाजता कंधार तालुक्यातील पानभोशी येथील महादेव मंदिराच्या टेकडीवर पोहोचलो, लागलीच श्रमदानाला सुरुवात करून झाडांची लागवड केली.*णि निसर्गाची प्रामाणिक सेवा करण्याची मोठी संधी आज उपलब्ध झाली.*

👉 *निसर्गाकडून माणूस भरपूर काही घेतो, त्यामुळे निसर्गाची सेवा ही आपली सर्वांची जबाबदारी…*

🌱 *सकाळी 8 वाजता ५४ जणांचा समावेश असणारी वसुंधरा टीम लातूरवरून कंधारला निघाली, 11 वाजता कंधार तालुक्यातील पानभोशी येथील महादेव मंदिराच्या टेकडीवर पोहोचलो, लागलीच श्रमदानाला सुरुवात करून झाडांची लागवड केली.*

👉 *प्रचंड उत्साहात सर्वांनी मिळून आजचा हा उपक्रम यशस्वी केला. खड्डे केले, झाड लावली अन आळे सुद्धा केले.*

🌱 *बघता बघता 551 झाडांची लागवड झाली, यात निसर्ग सेवा गटातील सदस्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. खरोखरच निसर्ग सेवा गट, पानभोशी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे, त्यांचा अभिमान वाटतो.*

🙏🏻 *कंधार येथील श्री. शिवाजी विधी महाविद्यालयाचा सहभाग आमचा उत्साह वाढविणारा होता.*

🌱 *शेवटी सर्वांनी मिळून वनभोजनाचा आस्वाद घेतला, आणि परतीच्या मार्गाला लागलो.*

👉 *हा इव्हेंट नाही.. निसर्गाची रक्षण करण्याची आमची प्रामाणिक तळमळ आहे. म्हणून तर 110 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून तिथपर्यंत पोहोचलो आणि मोहीम यशस्वी करूनच परतलो.*

🌱 *भविष्यात मराठवाड्यातील सर्वच पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांना सोबत घेऊन वृक्षांची चळवळ घराघरात नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.*

🌱 *परतीचा प्रवासाला सुरुवात करतानाच वरुणराजाने हजेरी लावली… शब्दांत न मांडता येणारा आजचा दिवस अन प्रत्येक क्षण…*

🌱 *वसुंधरा प्रतिष्ठान सर्व निसर्ग प्रेमी सदस्य, श्री. शिवाजी विधी महाविद्यालय, कंधार निसर्ग सेवा गट पानभोशी, समस्त ग्रामस्थ, लोहा येथील वृक्षमित्र फाउंडेशन सर्वांचे मनस्वी अभिनंदन….*

 

संबंधित पोस्ट

देशातील जनतेला महागाईपासून वाचवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी विनंती राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली

राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत,. मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची परिस्थिती…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-निवडणूक निरीक्षक वेद पती मिश्र आणि जिल्हा निवडणूक अधिकारीडॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली मतमोजणी केंद्र व मतदान केंद्राची पाहणी• निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्या दिल्या सूचना

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बारामतीतील काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. थोड्याच वेळात त्यांच्या अंत्यसंस्कारांची तयारी करण्यात येणार आहे.

vishwatmaklokswamivarta

मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढ…

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवात आरोग्य विभागाकडुन आरोग्य विषयक व्यापक जनजागृती

vishwatmaklokswamivarta