vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणार्‍या मंदिरांतील चोर्‍या कधी थांबणार ?मंदिरांतील चोर्‍या रोखण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने पुढाकार घ्यावा !- ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी…

कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणार्‍या मंदिरांतील चोर्‍या कधी थांबणार ?मंदिरांतील चोर्‍या रोखण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने पुढाकार घ्यावा !- ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी…

 

राज्य प्रतिनिधी    महाराष्ट्रातील लहान मंदिरेच नव्हे, तर अनेक मोठ्या मंदिरांमध्ये वारंवार चोर्‍या होण्याच्या घटना सतत घडत आहेत. आता तर ‘सीसीटीव्ही’ लावलेल्या आणि अनेक सुरक्षा रक्षक असलेल्या मंदिरांमध्येही चोर्‍या होण्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनावर अवलंबून न रहाता आता मंदिर व्यवस्थापनाने देवनिधीचे रक्षण करण्यासाठी सक्षम सुरक्षा व्यवस्था उभी करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मत ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केले.

 

नुकतेच नगर जिल्ह्यातील (शेवगाव, अमरपूर) येथील श्री रेणुकामाता मंदिरातील देवीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने असा मोठा ऐवज चोरीला गेला आहे. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आणि पाच सुरक्षा रक्षक तैनात होते. तरीही चोरी कशी झाली ? हा प्रश्न निर्माण होतो. एकूणच सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा अभ्यास करून चोर्‍या केल्या जात आहेत. श्री रेणुकामाता मंदिरच नव्हे, मागील महिन्यात डोंबिवलीतील श्रीराम मंदिरातही सीसीटीव्ही असतांनाही चोरी झाली. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनाने केवळ सुरक्षा रक्षक वा सीसीटीव्ही कॅमेरे लावले म्हणजे आता चोर्‍या होणार नाहीत, या भ्रमात राहू नये. कधी मशीद, चर्च, गुरुद्वारा वा अन्य धर्मीय प्रार्थनास्थळांमध्ये चोर्‍या झाल्याच्या बातम्या कधी ऐकायला येत नाहीत; मग केवळ हिंदूंच्या मंदिरांमध्येच चोर्‍या का होतात ? देवनिधी सुरक्षित ठेवणे, हे मंदिर व्यवस्थापनाचे आणि भक्तांचेही कर्तव्य आहे. हिंदु समाजाने मंदिरांतील चोर्‍यांविषयी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. तसेच महाराष्ट्र शासनानेही मंदिरातील चोर्‍यांच्या संदर्भात एक धोरण आखून या चोर्‍यांना प्रतिबंध केला पाहिजे, असेही श्री. घनवट यांनी म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या निवडीची विधानसभेत घोषणा विधिमंडळ विशेष अधिवेशन २०२४-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह १७३ विधानसभा सदस्यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ..

vishwatmaklokswamivarta

स्वामी गोविंददेव गिरिजी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची ‘सनातन आश्रमा’त हृद्य भेट !भारताला जगात सर्वोच्च स्थानावर पोहोचवण्यात ‘सनातन आश्रमा’चे योगदान सर्वांत मोठे असेल ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक २६ जून रोजी

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी…

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

vishwatmaklokswamivarta

राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात तर आज नवनिर्वाचित मंत्रीमंडळाची बैठक