
सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून वस्तू व सेवा कर भवनाच्या कामाची पाहणी…
राज्य, प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज वडाळा (मुंबई) येथील निर्माणाधीन वस्तू व सेवा कर भवन इमारतीची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, वस्तू व सेवा कर विभाग, तसेच संबंधित कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
वस्तू व सेवा कर भवन, कार्यालय, प्रशिक्षण प्रबोधिनी, महाराष्ट्र शासनाचे विविध कार्यालय, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निवासस्थाने आदींची उभारणी या ठिकाणी होत आहे. या संपूर्ण कामाची सादरीकरणाद्वारे माहिती मंत्री श्री. भुसे यांनी वडाळा येथील प्रकल्पस्थळी आयोजित बैठकीत घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष कामाची पाहणीसुद्धा केली. पाहणीदरम्यान काम विहीत कालमर्यादेत, गुणवत्तापूर्ण व कामगारांच्या सुरक्षेच्यादृष्टीने विविध उपाययोजना राबवून पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी कामाची माहिती दिली.
वस्तू व सेवा कर भवन कामाच्या सादरीकरणानंतर वांद्रे ते वर्सोवा या स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी मार्ग कामाचे सादरीकरण करण्यात आले. सादरीकरण दरम्यान वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्गावरील प्रत्यक्ष झालेले काम, खर्च, भविष्यातील कामाचे नियोजन, मुख्य सागरी रस्त्याला जोडणारे जोडणी रस्ते आदींची विस्तृत माहिती मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी घेतली.
[23/08, 7:21 pm] Swamiji: लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा – आर.आर. पाटील
9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
गडचिरोली,(जिमाका)दि.23: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी. शुक्ल यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्यावतीने दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी शनिवारला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली तसेच तालुका न्यायालय, अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी दावे असे प्रलंबित वाद तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. यासाठी पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोठया प्रमाणात आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, 138 एन.आय.अॅक्ट प्रकरणे, भु-संपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन,मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पंतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषद व ग्रामपंचायत अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश असणार आहे. लोकन्यायालयात पारीत झालेल्या अवॉर्डची न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी करता येते. लोकन्यायालयात तडजोड केल्याने लोकांचा वेळ, श्रम व पैसा यांची बचत होते. दोन्ही पक्षकारांमध्ये असलेले वैर संपुन गोडवा, चांगले संबंध निर्माण होतात.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई मार्फत संपुर्ण राज्यात 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे नियोजन केले आहे. तरी सर्वांनी दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी होणा-या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन सचिव आर.आर. पाटील यांनी केले आहे.



