vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग दरम्यान मानवी मनोरे रचताना दूर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदाना शासन देणार विमा संरक्षण

दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग दरम्यान मानवी मनोरे रचताना दूर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदाना शासन देणार विमा संरक्षण.

 

 राज्य प्रतिनिधी:-

दहीहंडी उत्सव / प्रो-गोविंदा लीग मधील सहभागी गोविंदांना मानवी मनोरे रचताना अपघात/दूर्घटना होण्याची शक्यता असते. काही वेळा गोविंदा पथकातील गोविंदाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू घडून येतो किंवा गंभीर दुखापत होऊन जीवाला धोका निर्माण होतो. परिणामी अपघातग्रस्त गोविंदाना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. यानुषंगाने गोविंदाना विमा संरक्षण देण्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून ५० हजार गोविंदांना प्रति गोविंदा रु.७५/- चा विमा हप्ता याप्रमाणे एकूण रु.३७ लाख ५० हजार इतका निधी संबंधित विमा कंपनीस अदा करण्यासाठी दहीहंडी समन्वय समिती (महा) या संस्थेस वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

 

या योजनेंतर्गत विमा संरक्षणाचे स्वरूप पुढीलप्रमाणे राहील :- अपघाती मृत्यू विमा संरक्षण – रु.१०,००,००० (रु. दहा लक्ष), दोन अवयव किंवा दोन डोळे गमावल्यास विमा संरक्षण – रु.१०,००,०००(रु. दहा लक्ष), एक हात एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास विमा संरक्षण – रु.५,००,०००(रु. पाच लक्ष), कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व (Permanent total disablement) विमा संरक्षण – रु.१०,००,००० (रु. दहा लक्ष), कायम अपूर्ण/पक्षपाती अपंगत्व (Permanent partial disablement) विमा संरक्षण – विमा पॉलिसीमध्ये नमूद करण्यात आलेल्या टक्केवारी नुसार. अपघातामुळे रुग्णालयीन खर्च विमा संरक्षण – प्रत्यक्षात झालेला खर्च किंवा जास्तीत जास्त रु.१,००,०००/- (एक लक्ष).

 

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने याबाबतचा शासन निर्णय दि. 18 ऑगस्ट 2023 रोजी जारी केला असून महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 202308181630295321 या क्रमांकाने उपलब्ध करुन दिला आहे. विमा संरक्षणाचा कालावधी हा या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते दि. 8 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत राहील, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

औरंगाबादेत राडा! मनसेच्या कार्यकर्त्यांकडून पीएफआयच्या कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

vishwatmaklokswamivarta

देशातील  मोठे व्यवसायिक अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे; 17 हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा आरोप…

तरुणांनी शहीद भगतसिंग यांचे विचार आत्मसात करण्याची आज खरी गरज -माजी राज्यमंत्रीअर्जून खोतकर

vishwatmaklokswamivarta

अधिकाधिक महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ घ्यावा – मंत्री दादाजी भुसे

ईसिस’ दहशतवादी संघटनेकडून जालना शहराला ‘बॉम्ब’ने उडवून देण्याची धमकी… शहरात खळबळ…

राजगुरुनगर तालुक्यातील भूमाफीयांकडून शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणी-एसआयटी नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे