vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जी20 :जगभरातील देशांचे प्रमुख, राष्ट्राध्यक्ष भारतात एकाचवेळी एकाच व्यासपीठावर आले. यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जग जिंकले अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी .

जी – 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने  जगभरातील देशांचे प्रमुख, राष्ट्राध्यक्ष भारतात एकाचवेळी एकाच व्यासपीठावर आले. यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जग जिंकले अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली प्रतिनिधी

नवी दिल्ली येथे झालेल्या या ऐतिहासिक शिखर परिषदेत सहभागी होता आले ही अभिमानाची बाब असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा गतीने विकास होत आहे. देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आली.

कालच्या शिखर परिषदेतील भारावलेले वातावरण पाहून भारत  महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचा अनुभव आल्याची भावना देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

भारतात एकाच वेळी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या युरोपियन तसेच आफ्रिकन देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी झाले होते, ही उल्लेखनीय बाब आहे, ही  कामगिरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शिखर परिषदेत प्रधानमंत्र्यांनी मांडलेला न्यू दिल्ली जी -20 लीडर्स समिट डिक्लरेशनवर एकमत झाले. जी – 20 समूहाने उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

हे आपले मोठे राजनैतिक यश आहे. स्वच्छ इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भारताने जी 20 शिखर परिषदेत ‘ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स’ची घोषणा केली आहे

संबंधित पोस्ट

सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे ⁠थ्री स्टार करणार,राज्यातील १२५ वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद   – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट- मिरजमधील दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतींचे लोकार्पण

15 ऑगस्ट रोजी सर्वच भारतीय 75वा स्वतंत्र दिन साजरा करण्याच्या तयारीत आहेत. 15 ऑगस्ट रोजी दिल्लीपासून ते जम्मू-काश्मीरपर्यंत अलर्ट जारी

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-पालकमंत्री मकरंद जाधव पाटील· पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण· पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धाजंली.

शासकीय संस्थेची नूतन इमारत म्हणजे मुलांच्या आयुष्यामध्ये पर‍िवर्तन घडवणारी वास्तू – पालकमंत्री नितेश राणे शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाचे उद्घाटन

लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारला अर्थ मंत्रालयाचा पदभार…