
आज जुन्या संसदेतून बाहेर पडण्याचा हा क्षण भावनिक’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली प्रतिनिधी
आज 18 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबर पर्यंत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. आज जुन्या संसदेला निरोप देत खासदार 19 सप्टेंबर दिवशी संसदेच्या नव्या इमारती मध्ये कामाला सुरूवात करणार आहे.
आज 18 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबर पर्यंत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. आज जुन्या संसदेला निरोप देत खासदार 19 सप्टेंबर दिवशी संसदेच्या नव्या इमारती मध्ये कामाला सुरूवात करणार आहे. आज लोकसभेमध्ये कामाला सुरूवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहाला संबोधत देशाच्या मागील 75 वर्षांच्या आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी जुन्या इमारतीचा निरोप घेणं हा भावनिक करणारा क्षण असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सभागृहाच्या अध्यक्षांपासून स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणार्यांपासून ते संसदेच्या पत्रकारांपासून अगदी संसदेवरील हल्ल्याच्या वेळेस गोळ्या झेललेल्या जवानांना नमन केलं आहे.



