vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन*30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी लागणार

स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन*30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी लागणार

 

बुलडाणा, प्रतिनिधी: नाविन्यता सोसायटीमार्फत जिल्ह्यातील विद्यार्थ्याच्या नवसंकल्पनाना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज आयोजन करण्यात येत आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना दि. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे.

राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगाना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण जाहीर करण्यात आले आहे. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कार्यरत आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्टअप बळकट करणे, इनक्युबेटर्सची स्थापना व विस्तार, गुणवत्ता परीक्षण व बौद्धिक संपदा हक्कासाठी अर्थसहाय्य ग्रेड चॅलेंज स्टार्टअप वीक यासारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

या उपक्रमात जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे, त्यांच्या नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी पाठबळ पुरवणे मुख्य उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या msins.in या संकेतस्थळावर स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज या स्पर्धेचे समन्वय करण्यात येत आहे. स्पर्थेसाठी जिल्ह्यातील महाविद्यालये, शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्रशिक्षणार्थी स्पर्धेसाठी पात्र आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना msins.in, schemes.msins.in या संकेतस्थळावर दि. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील महाविद्यालय, विद्यार्थ्यांनी इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सहभागी व्हावे, तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयास प्रत्यक्ष अथवा 07262-242342 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

00000

 

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी एचआयव्हीबाबत जनजागृती करावी

*जिल्हा प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा, दि. २२ : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी एचआयव्ही, एड्सबाबत जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था ही एचआयव्ही, एड्स करीता कार्य करणारी संस्था आहे. ही संस्था नॅको, नवी दिल्ली यांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. या संस्थेच्या सहकार्याने सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये एचआयव्ही, एड्स जनजागृती करण्याकरीता प्रत्येक गणेश मंडळामध्ये फलक लावण्यात येत आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक गणेश मंडळांनी स्वखर्चाने एचआयव्ही, एड्स जनजागृती करण्याकरीता दोन बॅनर्स गणेश मंडळामध्ये लावावेत. याबाबत अधिक माहितीसाठी भागवत कव्हळे, क्रमांक ९९२२३४३४६९ यावर संपर्क करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती यांनी केलेले आहे.

000000

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंतीचा उत्सव समिती बुलढाणा..प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांची यावर्षी रेलचेल!

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम चित्ररथाचे उद्घाटन पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज करणार प्रबोधन

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आंबेडकर )पक्षाच्या ३७ व्या वर्धापन दिनासह त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचाही वाढदिवस साजरा…

देशाच्या संरक्षणात मराठा लाईट इन्फंट्रीची भूमिका महत्त्वाची- सांस्कृतिक कार्यमंत्री अड.आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान;१४ हजार लाभार्थ्यांना १२५ लक्ष रुपयांचा झाला लाभ

vishwatmaklokswamivarta

जत येथे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारण्यास मंजुरी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta