रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आंबेडकर )पक्षाच्या ३७ व्या वर्धापन दिनासह त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचाही वाढदिवस साजरा…
( सुरेश गायकवाड)
मुंबई प्रतिनिधी
मुंबई -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर ,पक्षाच्या ३७ व्या वर्धापदिनासह त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष , नेते , तरुणांचे कंठमणी दिपकभाऊ निकाळजे यांच्या ही वाढदिवसाच्या निमित्ताने चेंबूरच्या छेडानगर येथील पक्ष कार्यालयात नुकताच साजरा करण्यात आला. त्यावेळेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. मोहनलाल पाटील, तरुणीच्या प्रेरणास्थान महिला अध्यक्षा सुनीताताई चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, कार्यालय प्रमुख तानाजी मिसळे, उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ , प्रदेश संघटक कैलास जोगदंड, प्रदेश सचिव अशोक ससाणे, प्रशांत तोरणे, प्रदीप सोनवणे, आकाश घोडके, सचिन खरात यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यानी, मान्यवरांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पक्षाचा वर्धापदिनासह दिपकभाऊचा वाढदिवस साजरा करीत हजारो कार्यकर्त्यांनी काल पासून भाऊना शुभेच्छा देण्यासाठी आणि पक्षाची पुढील भूमिका जाऊन घेण्यासाठी आले होते.
यावेळेस हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मान्यवरांनी भाऊंना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा देऊन ,पक्षवाढीसाठी देखील समर्पणाच्या भावना व्यक्त केल्या.