vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दसरा मेळावा शिवाजी पार्कात घेण्यासाठी ठाकरे गट आक्रमक; पुन्हा पाठवणार पत्र, मनपा सहाय्यक आयुक्तांना दोन दिवसांचा अल्टिमेटम…

 दसरा मेळावा शिवाजी पार्कात घेण्यासाठी ठाकरे गट आक्रमक; पुन्हा पाठवणार पत्र, मनपा सहाय्यक आयुक्तांना दोन दिवसांचा अल्टिमेटम…

 

मुंबई  प्रतिनिधी

दसरा मेळाव्याच्या3 सभेला शिवाजी पार्क मैदानासाठी  ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेच्या  सहाय्यक आयुक्तांना दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात येणार आहे. तसेच, आज पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून एक पत्र मुंबई महापालिकेला (BMC) पाठवलं जाणार आहे. जर दोन दिवसांत शिवाजी पार्क मैदानाबाबत निर्णय नाही दिला, तर मात्र वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार ठाकरे गट पुढील भूमिका घेणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी  शिवसेनेच्या दोन्ही गटांनी परवानगी अर्ज दाखल केल्यानं प्रशासनासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

 

दसरा मेळाव्यासाठी दोन्हीही शिवसेनेचे गट मैदानात उतरलेले असताना शिवाजी पार्क मैदान हे आमच्याच गटाला मिळावं, यासाठी दोन्ही गटांकडून पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळू शकतो. दोन्ही गटांनी शिवाजी पार्क आपल्याला दसरा मेळाव्यासाठी मिळावा, यासाठी महिन्याभरापूर्वीच एक पत्र बीएमसी विभागीय कार्यालयाला पाठवलं आहे. आता याच पत्रावर निर्णय घेण्याआधी मुंबई महापालिका विधी विभागाचं मार्गदर्शन घेते आहे.

 

दरम्यान, शिवसेनेचा दसरा मेळावा ही शिवसेनेची खास ओळख. बाळासाहेब ठाकरेंची विशेष आठवण आणि शिवसैनिकांचा उत्साह म्हणजे दसरा मेळावा. 2021 पर्यंत दसरा मेळावा म्हणजे, शिवसेनेचाच आणि शिवाजी पार्कवर आव्वाज कुणाचा तर ठाकरेंचा हीच ओळख होती. पण शिवसेना फुटली आणि दसरा मेळाव्याला वादाचं ग्रहण लागलं. यंदाही तेच ग्रहण कायम आहे. त्यामुळे येत्या दसऱ्याला शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार शिंदेंचा की, ठाकरेंचा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित पोस्ट

पैठण शहरातील विविध विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानपरिषद सभापती यांच्या दालनाचे उद्घाटन

राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे येत्या काही दिवसांत आणखी भूस्खलन होण्याची शक्यता आहे, असा इशारा आयएमडीने दिला

मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा- मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम- दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज· 26 एप्रिल रोजी मतदान ; 16 हजार 589 मतदान केंद्र

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते ध्वजवंदन*

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेच्या’ एफ’ नॉर्थ कार्यालयासमोरील रस्ता प्रवाशांसाठी ठरतोय जीवघेणा..?