vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत फळपिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन..

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत फळपिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन..

 

सांगली, प्रतिनिधी: प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना, (अंबिया बहार) 2023-24 या योजनेची अंमलबजावणी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई मार्फत जिल्ह्यात करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत, अंबिया बहार मध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी यांना विमा बँकाकडे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत पिक निहाय, द्राक्ष(ब) फळपिकासाठी 15 ऑक्टोबर 2023, केळी फळपिकासाठी 31 ऑक्टोबर 2023, आंबा (क) फळपिकासाठी 31 डिसेंबर 2023, आणि डाळींब फळपिकासाठी 14 जानेवारी 2024 अशी आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.

 

या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. ही योजना शासन निर्णयातील अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी लागू राहील. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ऐच्छिक आहे. अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी खातेदारां व्यातिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त अधिसूचित फळपिकासाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येईल. अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल (उदा. डाळींब व द्राक्ष). केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहाणार आहे. उत्पादनक्षम अधिसूचित वय डाळींब व द्राक्ष 2 वर्ष,

 

आंबा 5 वर्ष या पेक्षा कमी वयाच्या फळबाग लागवडीस विमा संरक्षण घेतल्याचे निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता 30 टक्के दरापर्यंत मर्यादित केलेला आहे. त्यामुळे 30 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी स्विकारणे क्रमप्राप्त आहे. या योजनेंतर्गत 30 ते 35 टक्के पर्यंतचे अतिरिक्त 5 टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्विकारले असून 35 टक्केवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी 50:50 टक्के प्रमाणे भरावयाचा आहे.

 

योजनेच्या अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. कुंभार यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

पालकमंत्र्यांनी घेतला विविध योजनांचा आढावा: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध योजना अनुदानाची रक्कम बँकेने कपात करू नये- पालकमंत्री अब्दुल सत्तार

हिंदु विधिज्ञ परिषदेची राज्य शासनाकडे तक्रार !वक्फचे लाड बंद करा, वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का ?आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का?

महाराष्ट्र बंद, राज्यात महाविकासआघाडीचे नेते रस्त्यावर; शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ‘ही’ भूमिका

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 च्या मतमोजणीसाठी वाहतुक मार्गात बदल..

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय जंतनाशक मोहीम यशस्वीपणे राबवा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*

vishwatmaklokswamivarta

मौजपुरी येथील अजिंक्य ढोकळे 14 वर्ष वयोगटात कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम; तालुका स्तरावरही आला होता प्रथम; कुस्तीने वेधले सर्वांचे लक्ष

vishwatmaklokswamivarta