vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नागरी सहकारी बँकाच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती केंद्र सरकारशी चर्चा करणार    – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

नागरी सहकारी बँकाच्या अडचणी सोडवण्यासाठी समिती केंद्र सरकारशी चर्चा करणार    – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

 

            मुंबई, प्रतिनिधी : नागरी सहकारी बँका या शहरातील कमी उत्पन्न गटातील नागरिक, लहान व्यापारी आणि लघु उद्योगधंदे यांना बँकिंगच्या सोयी- सेवा उपलब्ध करून देतात. परंतु राज्यातील अनेक नागरी सहकारी बँका अडचणीत आहेत.या बँकांच्या अडचणी सोडविण्यासाठी समिती गठीत करावी, असे निर्देश सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

 

मंत्रालयात नागरी सहकारी बँकांच्या अडचणीसंदर्भात आयोजित बैठकीत श्री. वळसे पाटील बोलत होते. बैठकीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

सहकार मंत्री श्री. वळसे- पाटील म्हणाले, रिझर्व्ह बँकेच्या नागरी सहकारी बँकांसाठी असलेल्या जाचक अटी आणि स्थानिक पातळीवरील अडचणी यामुळे अनेक नागरी बँका अडचणीत येत आहेत. याबाबत सतत गाऱ्हाणी येत आहेत.

 

राज्य आणि केंद्र सरकारकडून काय मदत करता येईल, याबाबत गठीत समितीने अभ्यास करून राज्य शासनाकडे अहवाल सादर करावा. अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल. तो अहवाल केंद्र शासनाला पाठवून मदतीसाठी पाठपुरावा केला जाईल, असेही सहकार मंत्री श्री.वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

000

संबंधित पोस्ट

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी  प्रश्नांची उत्तरं द्या; काँग्रेसकडून इच्छुकांना आवाहन.

vishwatmaklokswamivarta

मोटार वाहन कर अधिनियमात सुधारणा

विशेष लेख-जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026काय करावे व काय करु नये मार्गदर्शक सूचना जारी…

vishwatmaklokswamivarta

राजकीय पक्षांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध राखण्याचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती यांनी केले आवाहन

परमवीर चक्र विजेत्यांना समर्पित असलेले पहिले उद्यान अत्याधुनिक सुविधायुक्त मासळी बाजाराचे भूमिपूजन-विकासासोबतच संस्कृतीच्या संवर्धनाला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘वंदे मातरम्‌’ उद्यानाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाच्या सर्वेक्षणासदि.2 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta