vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सोलापूरमधील चारा छावण्यांच्या देयकांचा अहवाल सादर करावा- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

सोलापूरमधील चारा छावण्यांच्या देयकांचा अहवाल सादर करावा- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

 

             मुंबई, प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील चारा छावण्यांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी, त्यातील त्रुटी तपासून अहवाल सादर करावा. याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

 

सोलापूर जिल्ह्यातील चारा छावण्यांची थकीत देयके देण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी आमदार जयंत पाटील, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर उपस्थित होते.

 

मंत्री अनिल पाटील म्हणाले की, सन 2018 च्या खरीप हंगामात शासनाने दु्ष्काळ जाहीर केलेल्या भागात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. एप्रिल ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीमधील प्रलंबित देयके अदा करण्याबाबत शेतकऱ्यांकडून वारंवार मागणी केली जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त अहवालामध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुरूस्त करून त्याबाबत सुनावणी घेवून अहवाल सादर करावा. याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल असेही मंत्री श्री.पाटील म्हणाले.

 

००००

 

संध्या गरवारे/विसंअ/

संबंधित पोस्ट

केंद्र सरकारने 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित .

मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी-दि.26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक बृहत विकास आराखडा तयार करा- सभापती प्रा.राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

मुंबई मेट्रो लाईन A 2 मुंबईकरांच्या सेवेसाठी लवकरच होणार खुली; पहा अंतिम  टप्प्यात..

vishwatmaklokswamivarta

आश्रमशाळांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार-मंत्री अतुल सावे