vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

 

बुलढाणा, प्रतिनिधी: राज्याचे मदत व पुनर्वसन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हे शनिवार, रविवार दि. 25 व 26 जानेवारी 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार शनिवार दि. 25 जानेवारी 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी 11.45 वाजता सिंदखेडराज येथे आगमन व जिजाऊ मॉ साहेब जन्मस्थळी अभिवादन आणि जिजाऊ सृष्टीस भेट. दुपारी 12.15 वाजता ॲड. नाझेर काझी(जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) यांच्या निवासस्थानी भेट आणि राखीव. दुपारी 12.45 वाजता देऊळगाव राजाकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता देऊळगाव राजा येथे आगमन व आमदार मनोज कायंदे यांच्या निवासस्थानी राखीव. दुपारी 1.45 वाजता बुलढाणाकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. सोईनुसार शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथे आगमन व राखीव.

रविवार दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9.10 वाजता शासकीय विश्रामगृह, बुलढाणा येथून पोलिस कवायत मैदानाकडे प्रयाण व सकाळी 9.15 वाजता शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार शासकीय विश्रामगृह, बुलढाणाकडे प्रयाण व राखीव. दुपारी 12 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बुलढाणा पक्ष कार्यालय येथील बैठकीस उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता बुलढाणा येथून शेगांवकडे(संत नगरी) प्रयाण. दुपारी 2.30 वाजता शेगांव येथे आगमन व श्री संत गजानन महाराज दर्शन. दुपारी 3 वाजता मुंबईकडे प्रयाण.

00000000

संबंधित पोस्ट

जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित…

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांचे आज मुंबईत आगमन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मंत्री जयकुमार रावल, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवरांनी स्वागत केले.

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून दोन महिन्यात 14 लाख 45 हजार रुपयांची मदत.. – जिल्हा स्तरावरच मदत मिळत असल्याने रूग्णांना दिलासा

*राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत* *कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न* *कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण आणि सामाजिक उन्नतीचे कार्य प्रेरणादायी*

vishwatmaklokswamivarta

लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार जानेवारीचा हप्ता-आ. खोतकर

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक मुलीने ‘एचपीव्ही’ लसीकरणाचा लाभ घ्यावा : पालकमंत्री जयकुमार रावल जागतिक महिला दिनानिमित्त दोंडाईचा येथे ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ