vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती (NMMSS)” व“दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती”ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती (NMMSS)” व“दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती”ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

 

 

ठाणे, प्रतिनिधी :- सन २०२३-२४ वर्षासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजनेसाठी (NMMSS) राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP २.० )(www.scholarships.gov.in ) वर नवीन आणि नूतनीकरण अर्जांच्या ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्यास १ ऑक्टोबर २०२३ पासून सुरुवात झाली आहे.

 

नवीन आणि नूतनीकरण नोंदणीची अंतिम तारीख 30नोव्हेंबर2023 आहे. राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत NMMSS परीक्षा शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये निवड झालेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी 2023-24 शैक्षणिक वर्षाची इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन अर्जदार म्हणून आणि ९ वी, १० वी , ११ वी उत्तीर्ण झालेल्या शिष्यवृत्ती धारकांनी स्वतःची नोंदणी आधार नुसार करावी लागेल. यापूर्वी शिष्यवृत्ती घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी दहावी, अकरावी आणि बारावीसाठी नूतनीकरण अर्जदार म्हणून स्वतःचे नूतनीकरण करावे लागेल.

 

तर केंद्र शासनाच्या अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग (DEPWD) मार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) द्वारे अपंग विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता ९ वी आणि १० वी) शिष्यवृत्ती लागू केली आहे. NSP २.० पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंदणी 01 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाली आहे. या योजनेचे तपशील या विभागाच्या वेबसाइटवर ( www.depwd.gov.in ) आणि राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (www.scholarships.gov.in) वर उपलब्ध आहेत. नोंदणी आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख पोर्टल 30 नोव्हेंबर 2023 आहे.

 

NMMSS साठी पात्रतेचे निकष :

 

१. पालकाचे उत्पन्न रु.३ लाख ५० हजार पेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा

 

आवश्यक आहे.

 

२. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित (टप्पा अनुदान सह) शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजना लागू

 

आहे.

 

३. केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच केंद्र/राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या

 

शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील, खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी

अपात्र आहेत.

 

४. इयत्ता १० वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास शिष्यवृत्तीसाठी

 

अपात्र करण्यात येईल.

 

५. इयत्ता १० वी मध्ये सर्वसाधारण (जनरल) विद्यार्थ्यास ६० टक्केपेक्षा अधिक गुण (अनुसूचित जाती / जमातीच्या

 

विद्यार्थ्यास ०५ टक्के सुट) इयत्ता ९वी मधून १० वी मध्ये गेलेले विद्यार्थी व ११ वी मधून १२ वी मध्ये गेलेले विद्यार्थी

 

प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे.

 

६. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्यांच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे.

 

७. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे.

 

८. विद्यार्थ्यांची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे. त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर

 

करणे आवश्यक आहे.

 

दिव्यांग विद्यार्थांसाठी असलेली विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष :

 

१. अनुदानित शाळांतील इयत्ता ९वी व १० वी च्या दिव्यांग विद्यार्थ्यांना (CwDs) प्रि – मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते.

 

२. सदर विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्के किंवा जास्त असावे. सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र

 

हे Rights of Persons with Disabilities Act 2016 मध्ये निकषांनुसार असावे.

 

३. एकाच पाल्यांच्या २ पेक्षा अधिक अक्षम (दिव्यांग) पाल्यांना ही शिष्यवृत्ती लागु नाही. मात्र दुसरे अपत्य जुळे

 

असल्यास त्यांना सदर शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल.

 

४. सदर शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागू राहील. विद्यार्थ्याने तीच इयत्ता रिपीट केल्यास या

 

शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही. विद्यार्थी नियमित असावा.

 

५. जर विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त शिष्यवृत्ती लागू होत असतील तर विद्यार्थ्याने त्याच्या सोयीनुसार लाभाची (लाभदायी)

 

शिष्यवृत्ती स्विकारुन दुसरी शिष्यवृत्ती वरिष्ठ कार्यालयास कळवून रद्द करवून घ्यावी. मात्र विद्यार्थी निवास,

 

निवासासाठी देय अनुदान किंवा अशा प्रकारची राज्यशासनाची किंवा इतर स्त्रोतांकडून पुस्तके किंवा इतर शैक्षणिक

 

साहित्य खरेदीसाठी प्राप्त मदत स्विकारु शकतात.

 

६. शिष्यवृत्तीधारक जर केंद्रशासनाच्या किंवा राज्यशासनाच्या अर्थसहाय्यित परीक्षा शिष्यवृत्तीधारक जर केंद्रशासनाच्या किंवा राज्यशासनाच्या अर्थसहाय्यित परीक्षा केंद्रावर प्रशिक्षण घेत असतील तर ही

 

शिष्यवृत्ती सदर कालावधीसाठी बंद राहील.

 

७. पालकांचे उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतातून प्राप्त वार्षिक उत्पन्न रु.२५ हजार पेक्षा जास्त नसावे.

 

शिष्यवृत्ती रक्कम :

 

१ NMMSS साठी वार्षिक १२ हजार रुपये.

 

२. दिव्यांग विद्यार्थांसाठी असलेली विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती वार्षिक ९ हजार ते १४ हजार ६०० रुपये.

 

वेळापत्रक (NMMSS व प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी) :

 

ऑनलाईन अर्ज सादर करणे सुरुवात – १ ऑक्टोबर २०२३, ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख -३०

 

नोव्हेंबर २०२३, शाळास्तर अर्ज पडताळणी अंतिम तारीख – १५ डिसेंबर २०२३, जिल्हा स्तर अर्ज पडताळणी अंतिम तारीख -३० डिसेंबर २०२३.

 

दोन्ही योजनांसाठी पात्र लाभार्थानी विहित कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावेत, असे शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र पुणे – 1शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी कळविले आहे.

 

00000000

संबंधित पोस्ट

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

माय मराठीसाठी सोन्याचा दिवस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत अतिधोकादायक इमारत कोसळली; दुकानदार ढिगाऱ्याखाली अडकला, सुदैवाने बचावला

vishwatmaklokswamivarta

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बिहार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नी बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*बौद्ध आंबेडकरी जनतेचे आझाद मैदानात रखरखत्या उन्हात विराट शक्तिप्रदर्शन*

vishwatmaklokswamivarta

सुर्यवंशी क्षत्रिय समाजाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे माहीम विधानसभा उमेदवार अमित ठाकरे यांना जाहीर पाठिंबा….

vishwatmaklokswamivarta