vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

मध उद्योग वाढीसाठी प्रशिक्षण व साहित्य वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

मध उद्योग वाढीसाठी प्रशिक्षण व साहित्य वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

 

सातारा प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने मधमाशा पालन उपक्रमास उद्योग म्हणून चालना देण्यासाठी मध केंद्र योजना सुरू केलेली आहे. ही योजना राज्यात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यांत येते आहे. या योजनेअंतर्गत मधपेट्या साहित्य व वसाहती घेणेसाठी 50 टक्के स्वःगुतवणुक व 50 टक्के शासन अनुदान व ते साहित्य स्वरूपात देण्यात येणार आहे इच्छुकांनी 27 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

 

योजनेच्या लाभासाठी मंडळाकडून विहित कालावधीचे प्रशिक्षण पुर्ण करणे बंधनकारक आहे. मधकेंद्रचालक किमान दहावी पास असावा वय २१ वर्षापेक्षा जास्त असावे. त्यांच्या नावे अथवा कुटुंबातील व्यक्तिच्या नांवे एक एकर शेतजमिन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थीकडे मध माशापालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असणे आवश्यक आहे व त्यांना २० दिवसांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

 

मधपाळ योजनेसाठी अर्जदार साक्षर असावा स्वतःची जमिन असल्यास प्राधान्य देण्यात येईल. १८ पेक्षा जास्त वय असावे. अर्जदाराने मंडळाचे मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्रांत १० दिवसाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

 

या योजनेचा लाभ घ्यावाचा असेल, त्यांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, प्लॉट नंबर ए. १३. एम. आय. डी. सी., देगाव फाटा सातारा येथे अर्जासाठी संपर्क कारावा. निश्चित लक्षांक पेक्षा जास्त अर्ज आलेस, लॉटरी पदतीने निवड करण्यात येईल, असेही जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्यासाठी युवक व युवतींनीऑनलाईन अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात नाफेडतर्फे चना खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरु

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला यश!5 हजार 700 लोकांनी सोडले व्यसन; 5.84 लाखांचा दंड वसूल…

vishwatmaklokswamivarta

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा 26 सप्टेंबर 2025 रोजी जालना जिल्हा दौरा

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी विविध कृषी औजारासाठी पंचायत समितीमध्ये 30 नोव्हेंबरपर्यत अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

अमृत पेठ-2026 उद्योजक मेळाव्याला 6 मार्चपासून सुरवात..