vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्ह्यात नाफेडतर्फे चना खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरु

जिल्ह्यात नाफेडतर्फे चना खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरु

 

बुलढाणा, प्रतिनिधी: खरीप हंगाम 2024-2025 मध्ये केंद्र शासनाच्या आधरभुत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने 27 मार्च 2025 पासून चना खरेदीसाठी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह 25 एप्रिलपर्यंत संबंधीत खरेदी केंद्रावर चना खरेदी करीता नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम.जी. काकडे यांनी केले आहे.
 केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत हमीदराने चना खरेदीसाठी नोंदणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या. बुलढाणा, मेहकर, लोणार, शेगांव, संग्रामपुर, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था, चिखली, बिबी फार्मर प्रोड्युसर कंपनी, पिंप्री खंदारे/दुसरबीड, कृषि उत्पन्न बाजार समिती संग्रामपुर केंद्र – वरवट बकाल, कृषि उत्पन्न बाजार समिती शेगाव केंद्र – माटरगांव, ऑर्गसत्व ऑर्गनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी, देऊळगावराजा, तापडीया ॲग्रो प्रोसेसिंग कंपनी सिंदखेडराजा, श्रीनंदना महिला फार्मर प्रोड्युसर कंपनी अंजनी खु., सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, साखरखेर्डा, शेतीसेवा अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी बिबी, विदर्भ समृध्दी कृषि प्रोड्युसर कंपनी जानेफळ, कुलभवाणी फार्मर प्रोड्युसर कंपनी, वडगांव पाटण, राजश्री फार्मर प्रोड्युसर कंपनी हिरडव, श्राव्यलक्ष्मी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी मेरा खुर्द, अमडापुर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी अमडापुर, जय सरदार कृषि विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी भोरटेक, माजगदंबा फार्मर प्रोड्युसर कंपनी, जांभुळधाबा, बळीराजा कृषिमाल प्रक्रिया बहुउद्देशिय सह. संस्था पळशी झांशी, देवि तुळजाई अॅग्रोटेक प्रो. कं. लि. मारोतीपेठ, किसान कृषिमाल प्रक्रिया सह. संस्था सोनाळा, संत देविदास महाराज शेतकरी प्रो. कं. सिनगांव जहांगिर, झोटिंगा ॲग्रो प्रो. कं. लि. वाघाळा, मॉ. तुळजाई अॅग्रो फार्मर प्रो. कं. लि. गोरेगांव, संत गजानन महिला फार्मर प्रो. कं. लि. धामनगांव बढे, अॅक्टीफील्ड फार्मर प्रो. कं. मोळा, शिवशंभो अॅग्रोटेक प्रोड्युसर कंपनी धाड अशी एकूण 32 खरेदी केंद्रांवर चना खरेदी नोंदणी सुरु करण्यात आले आहे.
चना नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, सातबारा ऑनलाईन पिकपेरासह, बँक पासबुकची आधारलिंक केलेली झेरॉक्स व मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रांसह खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पत्राव्दारे करण्यात आले आहे.
000000

संबंधित पोस्ट

दानवे परिवाराच्या वतीने दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न जालना जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व राजकीय पक्षाने एकत्रित यावे  – माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे जालना जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला – मा.आ.कैलासजी गोरंटयाल जिल्ह्यातील जनतेने दानवे परिवाराला भरघोस प्रेम दिले – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

नांदेड, परभणी, सातारा, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस मान्यता – मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न**खरीप हंगामात बोगस बियाणे व खतांचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी**- पालकमंत्री शंभूराज देसाई*

4 सप्टेंबरला पोलिस पाटील भरतीसाठी आरक्षण सोडत

vishwatmaklokswamivarta

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ;कर्ज योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास कामांबाबत सर्व विभागांनीउपाययोजना संयुक्तपणे राबवाव्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी