
मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील मराठा क्रांती मोर्चा आणि सकळ मराठा समाजाची मागणी
जालना (प्रतिनिधी) ः मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा – कुणबी, कुणबी – मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्यात यावी तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखालील समितीसंदर्भात आणि मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी सन्माननीय न्या. संदिप शिंदे आणि सर्व समिती सदस्यांकडे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखेपाटील मराठा क्रांती मोर्चा आणि सकळ मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
आपल्या अध्यक्षतेखालील समितीला दिलेली कार्यकक्षा ही मराठवाड्यातील निजामशाहीतील मराठा ‘समुहास’ न्याय देण्यासाठी पुरेशी सुस्पष्ट नसून अतिशय अन्यायकारक आणि मराठा समूह म्हणून अन्यायकारक असून केवळ काही व्यक्तींना यातून न्याय मिळू शकेल आणि सकल मराठा समाजावर अन्याय होईल अशी कार्यकक्षा रचना केलेली आहे असे दिसते. कारण ”तपासाअंती ‘पात्र व्यक्तींना (मराठा समुहाला नाही) जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहीत करण्यासाठी” असा सुस्पष्ट उल्लेख आहे.!
ब) परंतु त्यातील निजामकालीन पुरावे, महसुली पुरावे, आणि अतिशय महत्त्वाचे
म्हणजे ‘राष्ट्रीय दस्तऐवज’ या पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणी अंती मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करणे ह्या अंतर्गत मी /आम्ही पुढील सर्व निजामशाहीतील वैधानिक राष्ट्रीय दस्तावेज आणि जनगणना या अतिशय महत्त्वाच्या महसूल/प्रशासकीय कामकाजाचे विस्तृत असे पुरावे सादर करत आहोत की, ज्यामुळे तत्कालीन निजामशाहीत मराठा आणि कुणबी ‘समाज/समुहाच्या’ वैध, कायदेशीर प्रशासकीय पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करून तपासणीअंती निजामशाहीतील मराठा आणि कुणबी या ‘एकच असलेल्या’ समुहाला (community व्यक्ती नव्हे) जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहीत करून तशी वैधानिक शिफारस करू शकाल.!
यातील सर्वात महत्त्वाचे राष्ट्रीय दस्तावेज म्हणजे तत्कालीन ‘जनगणना रिपोर्ट’ असून निजामशाहीमध्ये Census of India या ब्रिटिश इंडिया या अधिकृत जनगणनेअंतर्गतच हैदराबाद संस्थानची अतिशय शास्त्रशुद्ध दशवार्षीक जनगणना झालेली असून त्याचे ‘राष्ट्रीय दस्तऐवज’ उपलब्ध असून १८८१ (पुर्ण १८८४),१८९१, १९०१, १९११,१९२१, १९३१ आणि १९४१ च्या जनगणना अहवालाचा मी पुर्ण अभ्यास केला असून त्यानुसार पुढील अतिशय महत्त्वाच्या नोंदी मी आपल्यासमोर सदर ‘राष्ट्रीय दस्तऐवज’ सह मांडत आहे/दाखल करत आहे.!
तसेच१८८१ च्या जातनिहाय जनगणना नुसार Gazetteer of the nizam’s dominion (facsimile Reproduction) Aurangabad district original printed in १८८४) या अस्सल राष्ट्रीय दस्तावेज कडे आणि त्यातील वैध नोंदीकडे ही मी आपले लक्ष वेधू इच्छीतो! सदर नोंदीनुसार निजामकालीन १८८१ च्या जातनिहाय जनगणना (तत्कालीन जिल्हा औरंगाबाद-including जालना) नुसार तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्यातील तालुका निहाय जातनोंदीमध्ये प्रत्येक तालुक्यात इतर सर्व जाती प्रमाणे कुणबी जातीच्या नोंदी आहेत. यामध्ये स्वतंत्र मराठा जातीचा कोठेही उल्लेख नाही. त्यामुळे असे सिद्ध होते की आजची प्रचलित मराठा जात हीच तत्कालीन कुणबी जात आहे. आणि हीच परिस्थिती तत्कालीन औरंगाबाद सह नांदेड, उस्मानाबाद, बीड आणि परभणी या पाचही जिल्ह्यात नोंदवलेली आहे!
‘दशवार्षीक जनगणना नोंदीमधील’ Cast तसेच Community च्या ‘राष्ट्रीय दस्तावेज नोंदी’ आपणासमोर सादर करत आहे. सदर जनगणना या Cast नव्हे तर Community group टेबल नुसार झालेल्या आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.!



