vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी प्रवर्गातील इच्छुकांनी कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन..

मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी प्रवर्गातील इच्छुकांनी कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन..

 

राज्य प्रतिनिधी : कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/sarthi या गुगल लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

पत्रकात म्हटले आहे, छत्रपती शाहु महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत सन 2022-23 या वर्षामध्ये सारथीच्या लक्षित गटातील (मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी) या उमेदवारांना जिल्ह्यातील स्किल इंडिया पोर्टलवरील विविध सेक्टरमधील अभ्यासक्रमांचे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण ट्रेंनिंग सेंटरच्या माध्यमातून देऊन रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांमार्फत कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम मागणी नोंदविण्यासाठी नोंदणी फॉर्म तयार करण्यात आलेला आहे. त्याची लिंक https://kaushalya.mahaswayam.gov.in/users/sarthi ही आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिरयांनी घेतला ओबीसी योजनांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

देशभरातील मंदिरात आज महाशिवरात्रीनिमित्त उत्साहाचं वातावरण, भाविकांनी केली पूजा…

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यातील ऐतिहासिक धम्म परिषदेची सुवर्णाक्षरांनी नोंद बुद्धांच्या धम्मानेच जगाचे कल्याण : भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांचा उपदेश : धम्मदेसनेला विराट गर्दी : बुद्ध अनुयायांनी सहा तास शांतचित्ताने ऐकले प्रवचन

नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी केंद्रामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचीही भक्ती प्रबोधनात्मक स्वच्छता दिंडी

उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, मार्गारेट अल्वा उमेदवारी अर्ज करणार दाखल

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे  यांनी चित्रपटात नथुराम गोडसेची  भूमिका साकारल्याने नवा वाद..  भूमिकेबाबत नाना पाटेकरांची प्रतिक्रिया…

vishwatmaklokswamivarta