vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

लक्ष्मीपूजनाचा दिवस लोकल प्रवाशांसाठी मनस्तापाचा, भरदिवसा मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळा…

लक्ष्मीपूजनाचा दिवस लोकल प्रवाशांसाठी मनस्तापाचा, भरदिवसा मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळा…

मुंबई प्रतिनिधी दिवाळीतील रविवार आणि नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त यांमुळे नातेवाईकांसह आप्तस्वकीयांच्या भेटीगाठीसाठी लोकलने प्रवास करणाऱ्यांना मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाचा त्रास सहन करावा लागणार आहे. रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान रविवारी दिवसा ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे मुख्य मार्गावरील धीम्या आणि हार्बर मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.

 

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान शनिवारी मध्यरात्री १२.१५ ते रविवार पहाटे ४.१५पर्यंत ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आहे. यंदा या मुहूर्ताला रविवारचा दिवस आहे. त्यामुळे नातलग व मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठीचा दिवस रविवारच असेल. मात्र हाच मुहूर्त साधून मध्य रेल्वेने ब्लॉकचे नियोजन केले आहे.

 

सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे शेकडो लोकल फेऱ्या रद्द आणि विलंबाने धावणार आहेत. देखभाल-दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घोषित करण्यात येतो. मात्र याचे नियोजन करताना सणासुदीचे भान असणे आवश्यक आहे. पश्चिम रेल्वेने रात्रकालीन ब्लॉक घेतला आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळे हार्बर-मुख्य मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

 

मध्य रेल्वे

 

स्थानक : सीएसएमटी ते विद्याविहार

 

मार्ग : अप आणि डाऊन धीमा

 

वेळ : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५

 

परिणाम : धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे काही फेऱ्या रद्द, तर काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

 

हार्बर मार्ग

 

स्थानक : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे

 

मार्ग : अप आणि डाऊन

 

वेळ : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०

 

परिणाम : सीएसएमटी/वडाळा रोड ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान अप-डाऊन आणि सीएसएमटी ते वांद्रे गोरेगावदरम्यान अप-डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहे. पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

 

पश्चिम रेल्वे

 

स्थानक : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल

 

मार्ग : अप आणि डाऊन जलद

 

वेळ : शनिवारी मध्यरात्री १२.१५ ते रविवार पहाटे ४.१५

 

परिणाम : रविवारी दिवसा ब्लॉक नाही

 

संबंधित पोस्ट

राज्य महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे तालुकास्तरीय केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्यायिक मागण्या साठी क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मागण्यांसाठी मोर्चा…

पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवात ‘आदर्श गाव’ संकल्पना राबवणार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढाराज्यात 22 ते 25 एप्रिल 2025 या कालावधीतपंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हीरक महोत्सव…

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी2 जुलैपर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार- जितेंद्र भोळे

सुवर्णकारांनी अमित ठाकरेच्या पाठिशी उभे राहावे – नंदकिशोर तळावडेकर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सुवर्णकार सेना

vishwatmaklokswamivarta

मुंबईत उपनगरासह रिमझिम पाऊस सुरू झाला असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे

vishwatmaklokswamivarta

प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या शुभेच्छा