vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

जिल्ह्यात कुष्ठ व क्षयरुग्ण शोध मोहिमेस सुरुवात.

जिल्ह्यात कुष्ठ व क्षयरुग्ण शोध मोहिमेस सुरुवात.

 

छत्रपती संभाजीनगर, :- जिल्ह्यात कुष्ठरोग व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेस आज पासून सुरुवात झाली असून ही मोहिम बुधवार दि.६ डिसेंबर पर्यंत सुरु राहिल,असे सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ.एस.एन.हालकुंडे यांनी कळविले आहे. मोहिमे दरम्यान आपल्या घरी येणाऱ्या प्रशिक्षित स्वयंसेवकाकडून तपासणी करुन घ्यावे व त्यांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना यांनी केले आहे.

 

या मोहिम कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील २९ लक्ष ४१ हजार ५५० लोकसंख्येची तपासणी घरोघरी जाऊन होणार आहे. कुष्ठरोगाची व क्षयरोगाची तपासणी आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण भागात दररोज २० घरांची व शहरी भागातील दररोज २५ घरांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण २२५० टीम तयार करण्यात आल्या आहेत. या कामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी ४५० पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

कुष्ठरोगाची लक्षणे :-

 

तेलकट, गुळगुळीत, सुजलेली व लालसर त्वचा, त्वचेवर फिकट लालसर रंगाचा बधीर चट्टा, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, हातापायांची बोटे वाकडी असणे, मुंग्या येणे.

 

क्षयरोगाची लक्षणेः-

 

दोन आठवड्यापेक्षा अधिक कालावधीचा खोकला, दोन आठवड्यापेक्षा अधिक कालावधीचा ताप, वजनात लक्षणीय घट, भूक मंदावणे, मानेवर गाठी येणे.

 

जिल्ह्यात अशी लक्षणे असलेल्या लोकांनी मोहिमे दरम्यान आपल्या घरी येणाऱ्या प्रशिक्षित स्वयंसेवकाकडून तपासणी करुन घ्यावे व त्यांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

फलटण येथील पीएम किसान योजनेच्या प्रलंबित लाभार्थींना तत्काळ लाभ घ्यावा-कृषी मंत्री धनंजय मुंडे

vishwatmaklokswamivarta

कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या शिबीर (कॅम्प) कार्यालयात वाढ…

vishwatmaklokswamivarta

नागोठणे – वरवठणे मोघलकालीन पूल वाहतुकीसाठी बंद

छत्तीसगड च्या चक्रधर महोत्सवात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख अतिथी ..

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या उसाला ‘समृद्धी’ साखर कारखान्याचा यंदाही उच्चांकीच दर:पहिला हप्ता २८०० रूपये प्रती मेट्रीक टन : सतीश घाटगे यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

शिवचैतन्य प्रतिष्ठान जालना आयोजित मानाची दहीहंडी महोत्सव-२०२४ च्या माध्यमातून जालनेकरांना यंदाही १ सप्टेंबर रोजी मोठा जल्लोष