vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

नारी शक्ती महिला सम्मान बचत पत्र योजनेत 8 डिसेंबरपर्यंत सहभागी होण्याचे आवाहन.  

नारी शक्ती महिला सम्मान बचत पत्र योजनेत 8 डिसेंबरपर्यंत सहभागी होण्याचे आवाहन.

 

बुलडाणा, ):केंद्रीय अर्थसंकल्पात नारी शक्तीसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2023 योजना जाहीर केली असून, 1 एप्रिल 2023 पासून ती टपाल कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी 8 डिसेंबर 2023 पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन टपाल अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.

 

या योजनेमार्फत महिला खातेदार स्वतः किंवा पालकांना आपल्या अल्पवयीन मुलीच्या नावे 1 हजार ते 2 लक्ष रुपये जमा करून वार्षिक 7.5 टक्के त्रैमासिक चक्रवाढ व्याज मिळेल. त्यासाठी खातेदाराला आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत जोडावे लागेल. खातेदार दि. 31 मार्च 2025 पर्यंत दोन खात्यांमध्ये 3 महिन्याच्या अंतराने खाते उघडू शकतो. या योजने अंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व टपाल कार्यालयात दि. 20 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2023 नारी शक्ती महिला बचत पत्र अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महिलांनी महिला सम्मान बचत पत्र योजनेत सहभागी होण्यासाठी जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

राज्यांतर्गत पीकस्पर्धा सन 2025-26 जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा

रायगड काव्य कट्ट्यावर आनंदोत्सव साजरा

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

vishwatmaklokswamivarta

एक ऑगस्टपासून जिल्ह्यात महसूल सप्ताह  –जिल्हाधिकारी किशन जावळे

गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना जाहीर

जिल्ह्यातील फेरफार निकाली काढण्यासाठी2 फेब्रुवारीला फेरफार अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta