vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

छत्तीसगड च्या चक्रधर महोत्सवात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख अतिथी ..

*छत्तीसगड च्या चक्रधर महोत्सवात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख अतिथी ..

मुंबई प्रतिनिधी ~ छत्तीसगडचे राज्यसभा खासदार श्री देवेंद्र प्रताप सिंह जी यांच्या निमंत्रणावरून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले छत्तीसगडची सांस्कृतिक राजधानी रायपूर येथे आयोजित ४० व्या #चक्रधर_समारोहात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले.

या समारंभात छत्तीसगडचे राज्यसभा खासदार श्री देवेंद्र प्रताप सिंह यांची भेट घेतली. संगीत सम्राट महाराजा चक्रधर सिंह जी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. समारंभात देशभरातील प्रसिद्ध कलाकारांनी नृत्य आणि लोककलांचे सुंदर सादरीकरण केले.

छत्तीसगड दौऱ्यात ना.रामदास आठवले यांनी रायपूर येथील स्टेट गेस्ट हाऊस येथे भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या योजनांबाबत छत्तीसगड सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योजनांच्या झालेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.हेमंत रणपिसे प्रसिद्धी प्रमुख यांची माहिती

संबंधित पोस्ट

जायकवाडीतील उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करा – पालकमंत्री संजय शिरसाट नाथसागर जलाशयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना देणार भेट

सुराज्य अभियानाचे प्रसिद्धीपत्रक !कोकण हापूस संकटाच्या विळख्यात; प्रतिबंधित व विना ‘लेबल क्लेम’ कीटकनाशकांच्या शिफारशींची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करा ! – सुराज्य अभियान माहिती अधिकारातील पुरावे धक्कादायक ! कृषी विद्यापीठ व मँगो टास्क फोर्सच्या शिफारशींवर गंभीर प्रश्नचिन्ह !

बकरी ईद – जनावरांच्या कत्तलीसाठी प्रतिबंधित बाबी   येत्या 7 जूनला बकरी ईद सण आहे. बकरी ईद सणासाठी जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल, कुर्बानी करण्यात येत असते. या अनुषंगाने प्रतिबंधित बाबींची माहिती देणारा लेख…

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी बिहार व्होटर व्हेरिफिकेशनवरून इंडिया आघाडीचा एल्गार; संसदेच्या प्रांगणात यादीची चिरफाड करत केराची टोपली दाखवली..

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर ! अतिवृष्टीबाधीत भागांची केली पाहणी आपत्तीग्रस्त भागांचे युद्धपातळीवर पंचनामे करा गावकऱ्यांनी पंचनामे पूर्ण करुन घ्यावे  पंचनाम्याचे चावडी वाचन करा

vishwatmaklokswamivarta