vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांनी 30 नोव्हेंबर अखेर जाहिरनामा सादर करावा -नितिन उबाळे

राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांनी 30 नोव्हेंबर अखेर जाहिरनामा सादर करावा -नितिन उबाळे

 

सातारा प्रतिनिधी: राज्य निवडणूक आयोग यांनी सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम संपन्न केला असून त्यामध्ये राखीव जागेवर निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी समितीकडे माहे ऑक्टोंबर 2023 मध्ये अर्ज सादर केलेले आहेत.

सदर अर्जावर संबंधित निवडणुकांमध्ये निवडून आले आहेत किंवा कसे याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावाची समितीने छाननी केली असता, जे उमेदवार हे आरक्षित (मागासप्रवर्ग) जागेवर निवडून आलेले नाहीत किंवा ज्या संबंधित अर्जदारांनी निवडून आल्याबाबतचा जाहीरनामा या कार्यालयाकडे सादर केला नसल्यामुळे संबंधित प्रकरणावर निर्णय घेता येत नाही.

तसेच सर्व प्राप्त अर्जापैकी अद्याप निवडून आल्याबाबतचा जाहीरनामा समितीस सादर न केल्यामुळे सदरचा प्रस्ताव महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र व त्यांच्या पडताळणीचे नियम 2012 मधील नियम 17 (2) / (3) मधील तरतुदीनुसार निकाली काढण्यात येतील याची सर्व निवडणुकीमध्ये सहभागी उमेदवारांनी नोंद घेणे गरजेचे आहे. सबब सर्व संबंधित उमेदवारांनी आपले प्रकरणी विहित कालमर्यादेत जात पडताळणी प्रक्रिया पार पाडण्याच्या उद्देशाने दि. 30 नोव्हेंबर 2023 अखेर आरक्षित (मागासवर्ग) जागेवर निवडून आल्याबाबतचा जाहिरनामा या कार्यालयास सादर करावा.

तरी या संबंधित अर्जदारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी निवडणुकीमध्ये राखीव जागेवरती निवडून आल्याबाबतचा जाहिरनामा दि. 30 नोव्हेंबर 2023 अखेर समितीस सादर करावेत, असे आवाहन नितीन उबाळे, सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

लोकसभा निवडणुकीसाठी सहा उमेदवारांचे अर्ज दाखल

आज ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड, अहिल्यानगर येथे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर्सचे निवासी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न..

vishwatmaklokswamivarta

मतदार जनजागृतीसाठी महिलांनी घ्यावा पुढाकार-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील भरती प्रक्रिया पारदर्शक व ऑनलाईन होणार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

सर्व विभागांनी ग्रामिण भागात समन्वयाने आरोग्यसेवा द्याव्या- जिल्हाधिकारी स्वामी