vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनी अभिवादन! देशात शांतता राहावी म्हणून जालन्यातून शांतीदुत सोडले

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनी अभिवादन! देशात शांतता राहावी म्हणून जालन्यातून शांतीदुत सोडले

 

जालना/प्रतिनिधीक्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 133 वी पुण्यतिथी जालना शहर महानगरपालिकेत मंगळवारी (दि.28) साजरी करण्यात आली.

यावेळी जालना शहर महापालिकेचे कार्यालयीन अधिक्षक विजय फुलंब्रीकर यांच्यासह अखिल भारतीय ओबीसी एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे, शासकीय कंत्राटदार सुरेश रत्नपारखे , कडुबा वाकेकर, दशरथ तोडुळे, अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन वानखेडे, गंगुबाई वानखेडे, मंगला खांडेभराड, सावता तिडके, गोपी मोहिते, शिवलाल घाडगे, अरूण वानखेडे, निखील पाऊलबुध्दे, बंडु जाधव, कु. ऋतुजा सुनिल खरात, अमर घायाळ, चंद्रकांत लहु चव्हाण, किरण पाटील, विष्णु घायाळ,संदीप जैवाळ, वेदांत फुलंब्रीकर आदिंची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना बाबासाहेब वानखेडे म्हणाले की, ज्योतिबांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यावर काम केले. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी 1888 मध्ये बहाल केली. स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते. यावेळी देशात शांतता राहो यासाठी शांतीदुत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले पुर्णाकृती पुतळ्यासमोरून सोडण्यात आले. यावेळी समता सैनिक व फुले अनुयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

आफ्रिकेच्या नांबिया वरून येणारे चित्ते जयपूर ऐवजी ग्वालियार मार्ग कोनो नॅशनल पार्क मध्ये येणार

vishwatmaklokswamivarta

मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट, हवामान विभागाचा इशारा

पाणी टंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील चार गावांसाठी टँकर मंजूर

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यामध्येकोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही- उद्योग मंत्री उदय सामंत

मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

उत्तर प्रदेश च्या  गाजियाबाद मधील घटना : सोसायटीच्या लिफ्ट मध्ये लहान मुलाला चावला पाळीव कुत्रा; मालकाविरूद्ध गुन्हा दाखल

vishwatmaklokswamivarta