vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे   – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे   – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

 

 

 

        सांगली, प्रतिनिधी: जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्षे, ज्वारी आदि पिकांची पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी विविध ‍ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जावून पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधितांना तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

 

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, मिरज प्रांताधिकारी उत्तम दिघे, उपविभागीय कृषि अधिकारी मिरज रमाकांत भजनावळे, तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे, तंत्र अधिकारी (विस्तार) एन. डी. माने, ‍मिरज तालुका कृषि अधिकारी श्री. मिलींद निंबाळकर व तासगाव तालुका कृषि अधिकारी श्री. सर्जेराव अमृतसागर, संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, तलाठी, कृषि सहायक उपस्थित होते.

 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत चर्चा घडवून आणू व पंचनाम्याच्या अहवालानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असा ‍दिलासा दिला.

 

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मिरज तालुक्यातील काकडवाडी, कदमवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील धुळगाव, कोंगनोळी, तासगाव तालुक्यातील कुमठे आदि ठिकाणी नुकसान झालेल्या ज्वारी व द्राक्षे पिकांची पाहणी केली. तसेच कोंगनोळी येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी सागर लक्ष्मण वावरे यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले.

 

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी मार्च अखेरपर्यंत शंभरटक्के खर्च करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

उत्तम क्रीडापटू घडविण्यासाठी चांगल्या क्रीडा स्पर्धांची भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

राष्ट्रीय पोषण माह’च्या माध्यमातून महिला व बालकांच्याआरोग्यासंदर्भात जनजागृती- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे‘आठव्या राष्ट्रीय पोषण माह’चे १७ सप्टेंबर रोजी उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

भारतीय रेल्वेची विशेष बातमी, रेल्वे 3 तासांनी लेट झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे मिळणार रिफंड…

चीन पुरस्कृत हॅकर्सकडून लद्दाख परिसरातील वीज केंद्रे लक्ष्य- रिपोर्ट

सासवड-जेजुरी भुयारी गटार प्रकल्पांना निधी देणार- उद्योग मंत्री उदय सामंत