vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

गुणवत्ता वाढीसाठी स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे     – मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेत मुलांमध्ये पुणे तर मुलींमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाने मारली बाजी..

गुणवत्ता वाढीसाठी स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे     – मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेत मुलांमध्ये पुणे तर मुलींमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाने मारली बाजी..

 

 

 

जालना, प्रतिनिधी- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद यांच्यावतीने जालना शहरात जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित 17 वर्षा खालील मुले व मुलींच्या राज्यस्तर शालेय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते शनिवारी पार पडले. याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना वर्षा मीना म्हणाल्या की, खेळामध्ये गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्वांनी स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे आहे, हार-जीत ही चालूच राहणार आहे, जिंकलो किंवा हरलो यावर लक्ष देण्यापेक्षा स्पर्धेत आपण सहभागी झालो किंवा नाही हे महत्त्वाचे आहे. खेळाडूंनी नेहमी टीम स्पिरिटने काम केले पाहिजे, मग खेळाची स्पर्धा असो किंवा आपले दैनंदिन जीवन असो, टीम स्पिरिटने काम करणारे स्वतःही यशस्वी होतात व आपल्या सहकाऱ्यांनाही यशस्वी करतात.

 

जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रस्ताविकामध्ये स्पर्धेचे महत्व विषद करून आयोजन समितीच्यावतीने पालकमंत्री अतुल सावे , जिल्हाधिकारी डॉ . श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून प्रथमच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना जिल्हा नियोजन समिती व जिल्हा क्रीडा परिषदेच्या माध्यमातून टी शर्ट, कॅप, देण्यात आलेली असून स्पर्धेत प्रथम , व्दितीय , तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या संघातील खेळाडूंना स्मॉर्ट वॉच, मेडल , ट्रॉफी व राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झालेल्या खेळाडूंनापण स्मार्ट वॉच देण्यात आल्याचे सांगितले.

 

महाराष्टू बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद ईखनकर यांनी बेसबॉल खेळाची माहीती देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

 

राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेत मुलांमध्ये पुणे विभाग तर मुलींमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाने बाजी मारली.

 

यावेळी मंचावर महाराष्ट्र बेसबॉल संघटनेचे तांत्रिक समिती प्रमुख इंद्रजित नितनवार , सहसचिव प्रदीप साखरे , जिल्हा बेसबॉल संघटनेचे सचिव प्रमोद खरात , जिल्हा क्रीडा संघटक शेख चाँद पी.जे., राज्य संघ निवड समिती सदस्य नंदन परब, रेखा धनगर, क्षितिजा गव्हाणे, तसेच विविध जिल्ह्यांचे सचिव राजेंद्र बनसोडे, नारायण बत्तुले, अमरावती क्रीडा अधिकारी दीपक समदुरे, क्रीडा संघटक विजय गाडेकर आदींची उपस्थिती होती.

 

याप्रसंगी स्पर्धेत पंचांचे काम करणारे आनंदा कांबळे, आकाश साबणे, गणेश बेटुडे, निशांत राजपूत, गणेश भोसले, भागवत पाटील, शाहू देशमुख, नयन नवले, सचिन जाधव, नंदू गायके, संतोष अवचार, सचिन सोनकांबळे, सायमा बागवान यांचा वर्षा मीना यांच्या हस्ते बुके व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, तसेच आयोजन समितीत काम करणारे एकनाथ सुरुसे, सोपान शिंदे, विकास काळे, राजेश ठाकूर, देवा चित्राल, सोमनाथ नलावडे, सतीश गाभुड, अमोल सातपुते, ज्ञानेश्वर कळसे, अशोक शिंदे, यासीन बागवान, जयपाल राठोड, प्रसन्न पंडीत, इस्माईल शेख, कैलास नाटकर, श्रीमती राणी नाटकर यांचाही याप्रसंगी वर्षा मीना यांच्या हस्ते बुके व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे उत्कृष्ट सूत्र संचालन केल्याबद्दल देवेंद्र बारगजे यांचाही सत्कार करण्यात आला.

 

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व विभागीय क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा प्रमुख रेखा परदेसी, क्रीडा मार्गदर्शक शेख मोहम्मद, संतोष वाबळे, शेख हारून, राहुल गायके आदींनी परिश्रम घेतले.

 

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

युवा आयकॉन स्पर्धेत सहभागी व्हा– जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

vishwatmaklokswamivarta

खेलो इंडिया ट्रायबल गेम्स: 13 जानेवारीला अमरावतीत निवड चाचणी

आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी ‘असा’ असेल टीम इंडियाचा संघ

CISCE रिजनल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये वसंत विहार शाळेचा झेंडा* 14 वर्षाखालील मुलींची संपूर्ण टीम नॅशनलसाठी सिलेक्ट..

vishwatmaklokswamivarta

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त चर्चासत्र

जिल्हा युवा पुरस्काराकरीता प्रस्ताव आमंत्रित