vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विधानसभा कामकाज लक्षवेधी:तामदर्डी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना- मंत्री संजय राठोड…

विधानसभा कामकाज लक्षवेधी:तामदर्डी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना- मंत्री संजय राठोड…

 

नागपूर, प्रतिनिधी: मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याबाबत अंदाजपत्रक बनवण्याचे काम सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या बंधाऱ्यामुळे मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्यातील गावांना लाभ होणार असल्याची माहिती, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज विधानसभेत दिली.

 

सदस्य समाधान अवताडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

 

मंत्री श्री. राठोड म्हणाले की, या बंधाऱ्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी, तंडोर, सिध्दापूर, माचनुर आणि ब्रह्मपुरी तर मोहोळ तालुक्यातील आरबली, मिरी, बेगमपूर, घोडेश्वर, इनकी आणि दक्षिण सोलापूर मधील वडापुर या गावांना लाभ होणार आहे. या योजनेसाठी ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या बंधाऱ्यात ५०० दशलक्ष घन मीटर इतका पाणीसाठा होणार आहे. यामुळे परिसरातील ५२५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

संबंधित पोस्ट

दिल्ली स्फोट प्रकरणी महत्त्वाचा खुलासा, स्फोट झालेल्या गाडीत डॉ.उमर असल्याचं डीएनए टेस्टवरुन झालं स्पष्ट

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची संधी  

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग नवव्यांदा लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रध्वज फडकवणार, दिल्लीत कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात

दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यात प्रवाशांच्या सुख सुविधांसाठी नव्या बसेस दाखल…

vishwatmaklokswamivarta

अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तक संकेतस्थळावर उपलब्ध

उसतोड कामगारांच्या कष्टाप्रती समृद्धीने व्यक्त केली कृतज्ञताऊसतोड कामगार परिवाराचा सतीश घाटगे यांच्याकडून सपत्नीक सन्मान.. जिल्यात पहिल्यांदा झाला ऊसतोड कामगार परिवाराचा सन्मान सोहळा

vishwatmaklokswamivarta