
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा राज्यभर निषेध; अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आंदोलनं..
राज्य प्रतिनिधी
भगवान श्रीराम मांसाहारी होते या वक्तव्याने शरद पवार गटाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड पुन्हा चर्चेमध्ये आले आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याची भावना बोलून दाखत भाजपा नेते राम कदम यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे.
जितेंद्र आव्हाडांना तात्काळ अटक करा, अशी मागणीही राम कदम यांनी केली आहे. तसेच आव्हाडांनी माफी देखिल मागवी असं म्हटलं आहे.
भगवान श्रीराम मांसाहारी होते या वक्तव्याने शरद पवार गटाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड पुन्हा चर्चेमध्ये आले आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याची भावना बोलून दाखत भाजपा नेते राम कदम यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. दरम्यान राज्यभर भाजपा जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या फोटोला मारहाण करत त्यांच्या विरूद्ध घोषणाबाजी केली जात आहे



