vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

स्वित्झर्लंडच्या दावोस येथे 15 ते 19 जानेवारी दरम्यान जागतिक आर्थिक परिषद; महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दहा प्रतिनिधी मंडळ होणार सहभागी

स्वित्झर्लंडच्या दावोस येथे 15 ते 19 जानेवारी दरम्यान जागतिक आर्थिक परिषद; महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दहा प्रतिनिधी मंडळ होणार सहभागी…

 

राज्य प्रतिनिधी

स्वित्झर्लंडमध्ये दावोस  येथे 15 ते 19 जानेवारी या कालावधीत जागतिक आर्थिक परिषद होणार आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह दहा प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार आहे.

जागतिक आर्थिक परिषद  होणार आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह दहा प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आज आढावा घेण्यात आला. दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणूक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या जगभरातील उद्योगांशी उत्तम संपर्क, समन्वय राखा, परिषदेत ‘मॅग्नेटिक महाराष्ट्राचे’ प्रभावी ब्रॅण्डिंग करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गतवर्षी आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. 1 लाख 37 हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी 76 टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत. ते आता कार्यवाहीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत, ही समाधानाची बाब आहे. यंदाही दावोसमध्ये आपल्याला महाराष्ट्राचे प्रभावी ब्रॅण्डिंग करण्याची संधी आहे. पोलाद, माहिती तंत्रज्ञान, या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत उद्योग, ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत–ग्रीन हायड्रोजन या क्षेत्रातील उद्योग येतील. त्याचबरोबर कृषि-औद्योगिक, कृषि आणि वनोपज यांचे मूल्यवर्धन करणारे उद्योग यावेत, यासाठी प्रयत्न करण्यात यावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

महाराष्ट्रात उद्योगांसाठीची ‘इकोसिस्टिम’ अत्यंत उत्तम आहे, हे उद्योग जगतालाही माहीत आहे. त्यामुळे या परिषदेच्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेता येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले की, या गुंतवणूक परिषदेत जगभरातील आणि विविध क्षेत्रातील मातब्बर कंपन्यांचा प्रतिसाद मिळेल यासाठी समन्वय साधण्यात येत आहे. या परिषदेत गुंतवणूक करार आणि वाटाघाटी यासाठी विशेष संधी आहेत. त्यांचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील हिंसेमागे अतिरेकी संघटना रजा अकादमी असून तिच्यावर बंदी घाला, नाही तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू असा इशारा भाजपा नेते नितेश राणे यांनी दिलाय.

vishwatmaklokswamivarta

नाफा २०२५ महोत्सवात यंदा भरगच्चं कार्यक्रम!-२५ ते २७ जुलै रोजी सॅन होजे येथील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये मराठी तारेतारकांच्या उपस्थितीत रंगणार भव्य ग्लॅमरस मराठी चित्रपट महोत्सव!

vishwatmaklokswamivarta

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत  शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके  मताधिक्य घेताना दिसत आहे.मताधिक्यासोबत ‘नोटा’ची चर्चा

vishwatmaklokswamivarta

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या वेळेत वाढ…

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीतिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक,सनातन संस्था आयोजित विशेष कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन कि छुपा अर्बन नक्षलवाद -डॉ. दाभोलकर-पानसरे हत्येत सनातन संस्थेला गुंतवण्यामागे अंनिस आणि शहरी नक्षलवादी यांचे षड्यंत्र – चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था