
पुण्याच्या मार्केटयार्ड मधील झोपडपट्टीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. 2 सिलेंडरचा स्फोट होऊन आगीत 6 झोपड्या जळून खाक.. तर सुदैवाने यात जीवितहानी नाही, एक जण किरकोळ जखमी
पुणे प्रतिनिधी
पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर येथे गल्ली नं 11 मधील झोपडपट्टीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. 2 सिलेंडरचा स्फोट होऊन आगीत 6 झोपड्या जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सुदैवाने यात जीवितहानी नाही, एक जण किरकोळ जखमी झाल्याचं समोर आलंय. आगीत संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने 6 कुटुंबांचा संसार उघड्यावर पडलाय. आगीची माहिती समजताच अग्निशामक दलाच्या 6 गाड्यांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. अग्नीशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे.
मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर येथील झोपडपट्टीला आग लागल्याने सध्या पुणे शहरात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. या झोपडपट्टीत अतिशय चिकटून घरं असल्याने मोठी आग लागण्याची शक्यता होती. मात्र, फायर ब्रिगेडने 6 गाड्या आणि 4 वॉटर टँकर पाठवल्याने मोठी दुर्घटना टळली. याआधी देखील वारंवार या भागात आग लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या.



