vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

अवयवदान चळवळीला वेग येण्यासाठी जनजागृती करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अवयवदान चळवळीला वेग येण्यासाठी जनजागृती करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

 

            मुंबई, प्रतिनिधी अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच राज्यांमध्ये राज्याचा समावेश असून राज्यातील 149 अवयदात्यांनी केलेल्या अवयदानामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. अवयदान चळवळीला यश येत आहे. यासाठी अवयवदात्यांचे कुटुंब, डॉक्टर, परिचारिका, रुग्णालये, समुपदेशक, पोलीस या यंत्रणांचे अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

 

यासंदर्भात आरोग्य विभागाला दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, राज्यातील अवयवदानाची आकडेवारी वाढली असली तरी एवढ्यावर समाधान न मानता राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे, त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होणे आवश्यक आहे. अवयवदान जनजागृतीची गरज आहे.

 

वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून अवयदानासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षात अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. त्यामुळे अवयवदानाची वृत्ती वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे. अवयवदात्याचा मृत्यू झाल्यास आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन राज्य शासनातर्फे श्रद्धांजली अर्पण करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला केली आहे.

 

००००

 

वृ

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026: भाजप 140, शिवसेना 87, मुंबईसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला!

vishwatmaklokswamivarta

मा. न्यायालयाच्या आदेशाचे सरकारने कठोर अंमलबजावणी केल्यास दलित आदीवासी भूमिहीन कास्तकराचे कास्तपट्टे नियमानूकुलित होतील – अ‍ॅड. भास्कर मगरे

पुणे येथील‘खडकवासला जलाशय रक्षण’अभियान 23 व्या वर्षीही शतप्रतिशत यशस्वी !निसर्गाचा ऱ्हास न होता त्याचे संरक्षण झाले पाहिजे ! – भीमराव अण्णा तापकीर, भाजप आमदार, खडकवासला मतदारसंघ

जिल्ह्यातील गोरगरीबांसाठी पक्की घरे हेच ध्येय – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पात्र व्यक्तींना तात्काळ पट्टे वाटप करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा उपक्रम व्यापक स्वरुपात राबवावा – राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा