vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्रात शिक्षक होणार ब्रँड ॲम्बेसेडर तंबाखू सोडण्यासाठी -डॉ.प्रकाश गुप्ता 

महाराष्ट्रात शिक्षक होणार ब्रँड ॲम्बेसेडर तंबाखू सोडण्यासाठी -डॉ.प्रकाश गुप्ता

 

मुंबई प्रतिनिधी ,मुंबई प्रेस क्लब या ठिकाणी हिलीस या आंतरराष्ट्रीय तंबाखू मुक्त समाज संस्थेचे संचालक डॉ.प्रकाश गुप्ता तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होते.डॉ.प्रकाश गुप्ता यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधताना ,महाराष्ट्रात संपूर्ण लोकसंख्येच्या २७ टक्के लोकसंख्या तंबाखू सेवनाने होणाऱ्या समस्यांनी त्रस्त असून , भारतात तंबाखूशी संबंधित मृत्यूचा दर हा दररोज ३७०० व्यक्ती इतका आहे. या भयावह स्थितीचा सामना करण्यासाठी आता महाराष्ट्रातील शिक्षकांना तंबाखू सोडण्यासाठीचा ब्रँड ॲम्बेसेडर करत ” तंबाखू मुक्त समाज ” या जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात करणार असल्याची माहिती प्रेस क्लब येथे गुरुवारी हिलीस या आंतरराष्ट्रीय तंबाखू मुक्त समाज संस्थेचे संचालक डॉ.प्रकाश गुप्ता यांनी दिली.या जनजागृती कार्यक्रम अंतर्गत शाळांमध्ये तंबाखू नियंत्रणाचे प्रयत्न वाढवण्यासाठी शिक्षकांनाच महत्त्वपूर्ण प्रभावशाली व्यक्ति म्हणून सादर करण्यात येणार आहे. बिहार मध्ये या अगोदरच तंबाखू मुक्त समाज कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. आता महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे असे डॉ.मंगेश पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.तंबाखूच्या दुष्परिणामांची गडद छाया महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असून २० टक्के जनतेला तंबाखू सेवनामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुंबई बरोबरच पुण्यातील निसर्गरम्य परिसरात सुध्दा तंबाखू मुळे रोज होणाऱ्या मृत्यूची संख्या खूप मोठी आहे.असे डॉ.मंगेश पेडणेकर यांनी सांगितले.

तंबाखूमुळे केवळ मृत्यूच होत नाही तर श्वसनाशी संबंधित समस्या, हृदयविकार आणि विविध प्रकारच्या कॅन्सर सारख्या आरोग्य समस्याही निर्माण होताना दिसत आहेत . सार्वजनिक आरोग्यावर होणारा हा घातक परिणाम पाहून नाविन्यपूर्ण उपायांची गरज असून तंबाखू मुक्त समाज कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. असे डॉ. पेडणेकर यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधला.

 

.

संबंधित पोस्ट

महसूल विभाग:श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मुळ मालकांना परत करणार

vishwatmaklokswamivarta

अद्यापही ऊसदर जाहीर न केलेल्या कारखान्यांनी त्वरित दर जाहीर करावा**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

नागरिक केंद्रीत ‘आपले सरकार २.०’ पोर्टल कार्यान्वित करावे  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांनो २० मे रोजी कुठेही जाऊ नका, मनापासून मतदान करा’ : गायक शान यांचे आवाहन खार परिसरात मतदान जनजागृतीसाठी निघाली रॅली

वाहनांच्या नंबर प्लेटबाबत सुचना..

vishwatmaklokswamivarta

डाक विभागाची सांगलीत 19 डिसेंबरला पेंशन अदालत

vishwatmaklokswamivarta