
डिजीटल मीडिया संघटनेचे राज्य अधिवेशन
मुंबई : प्रतिनिधी डिजीटल मीडिया संपादक-पत्रकार संघटना महाराष्ट्राचं दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन २८ व २९ जानेवारी रोजी कोल्हापूर सिद्धगिरी कणेरी मठ येथे होत असल्याची माहिती संघटनेचे मुंबई अध्यक्ष संजय भेरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे गुरुवारी दिली.
अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे हस्ते होणार आहे. अधिवेशनाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत होणार आहे. महाराष्ट्र महागौरव व डिजीटल स्टार महागौरव पुरस्कार २०२४ यावेळी दिले जाणार आहेत.असे राज्य संघटक संजय जेवरीकर यांनी सांगितले . सचिन सावंत , पंडित मोहिते पाटील , आत्माराम नरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री हसन मुश्रीफ, खा. श्रीनिवास पाटील, आयुष्यमान भारत मिशन चे महाराष्ट्र समितीचे डॉ. ओमप्रकाश शेटे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्विकारले आहे.अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ संपादक-पत्रकार राजा माने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.



