vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इको फ्रेंडली लाईफ या संस्थेच्या वतीने १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन आणि किमान 700 कोटी वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत जनजागृतीच्यानिमित्ताने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धेचे आयोजन

 इको फ्रेंडली लाईफ या संस्थेच्या वतीने १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन आणि किमान 700 कोटी वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत जनजागृतीच्यानिमित्ताने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धा , चित्रकला स्पर्धेचे आयोजन

 

[सुरेश गायकवाड] मुंबई प्रतिनिधी
मुंबई- ३ को फ्रेंडली लाईफ या संस्थेच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी आपुलकी निर्माण व्हावी आणि देशाविषयी देशभक्ती वृद्धींगत व्हावी म्हणून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा, आणि व्हिडिओ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून किमान 700 कोटी वृक्षारोपण या उपकमाबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पर्यावरणतज्ञ अशोक एन. जे. सर यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात केले

आहे

या स्पर्धेत मोफत प्रवेश देण्यात आला असून 1/ गट- अ 5 वी 7 वी,2/ गट- ब 8 ते 10 वी,3/ गट- क ज्युनिअर कॉलेज,4/ गट- ड सिनिअर कॉलेज अशा गटामध्ये स्पर्धा होणार आहे. विशेष म्हणजे 1 ली ते 4 थी पर्यंत उत्तेजनार्थ बहिस देऊन त्या विद्यार्थ्यांना मी व माझा निसर्ग या विषयावर सहभागी होता येईल. आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 1/ चित्रकला स्पर्धा विषय- video/reels- माझे पर्यावरण माझी जबाबदारी,2/ निबंधलेखन स्पर्धा विषय- तरुण तगडा भारत जगात सर्वांत जास्त तरुण भारतात … तरीही तरुणांचे नेतृत्व नाही देशात ह्या विषयावर इंग्रजी, मराठी, हिंदी निबंध किमान 500 शब्दांचा असावा आणि तो सुस्पष्ट असावा वा बिलावा. शिवाय 1 मिनिटाची video, Reels ह्या तीनही भाषेत बनवावी. तसेच आपले चित्र हे A /4 साईजच्या पेपरवर असावे. आणि चित्राला शिर्षक दयावे. निबंधाच्या सुरुवातीला आणि चित्रकला पेपरच्या मागील बाजूस आपले नाव / पत्ता / शाळेचे

नाव/ इयत्ता स्पष्ट शब्दात लिहावे. निबंध आणि चित्र व्यवस्थित स्कॅन करून eail -ecofriendlylifeworld. at.gmail.com या इमेलवर 12 ऑगस्ट 2024 पूर्वी पाठवावे असेही त्यांनी कळविते आहे.

या स्पर्धेतील प्रत्येक गटातील 25 उत्कृष्ट स्पर्धकांना ट्रॉफी आणि सन्मानपत्र देण्यात येऊन पहिल्या तीन स्पर्धाकांना 10,000/,7000/,5000/ अशी बक्षिसे देऊन विशेष सन्मान करण्यात येईल.संपर्क- इको फ्रेंडली लाईफ , इ एफ एल सेंटर म्हसा मुरबाड कर्जत रोड, तालुका- मुरबाड जि – ठाणे 421401 महाराष्ट्र web-www.ecofriendly life .in

Email-ecofriendlylifeworld at gmail.com भ्रमणध्वनी 1/ 8888443392,9820657999,9619370267,9422776355 करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण लोकसेवेचा आनंद हाच खरा ब्रह्मानंद- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

शिर्डीचे साईबाबा भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ‘शिर्डी कृती आराखड्या’ची प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्य सचिव राजेश अग्रवालसिंहस्थ कुंभमेळा नियोजन आढावा बैठक..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात दोन महिन्यांसाठी विनापरवाना ड्रोन वापरास बंदी…

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे,  भाजपा मुंबई अध्यक्षआशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात काल सरासरी 39.5 मि. मी. पावसाची नोंद

ॲग्रीस्टॅक प्रकल्प सोमवार(दि.१६) पासून प्रत्येक गावात…

vishwatmaklokswamivarta