vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ज्येष्ठ पत्रकार विजय साखळकर मित्र मंडळाच्या वतीने स्व.विजय साखळकर यांची शोकसभा मुंबई मराठी पत्रकार संघात

ज्येष्ठ पत्रकार विजय साखळकर मित्र मंडळाच्या वतीने स्व.विजय साखळकर यांची शोकसभा मुंबई मराठी पत्रकार संघात.

 

मुंबई प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार विजय साखळकर मित्र मंडळाच्या वतीने स्व.विजय साखळकर यांची शोकसभा मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडली. या शोकसभेस ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी, के.रवि, भारत कदम हे उपस्थित होते.: हया वेळेस पत्रकार विजय साखळकर यांची मानस कन्या सोनल खानोलकर यांनी सांगितले की, साखळकर हे माझे गुरुवर्य होते. ते माझ्या वडिलांचे ( खतरनाक वृतपत्राचे संपादक सुरेश खानोलकर )यांचे चांगले मित्र होते. त्यांच्या जाण्याने मला मानसिक धक्का बसला आहे. कारण ते नेहमी मला मार्गदर्शन करीत. त्यांच्यामुळेच खतरनाक अंकांची अविरतपणे एवढी वर्षे वाटचाल सुरू होती. त्यांच्या लेखणीने अनेक प्रांत बेमालूमपणे हाताळाले होते. अशा अवलिया पत्रकाराचा शेवट मनाला चटका लावून गेला.

 तत्पूर्वी पत्रकार योगेश त्रिवेदी, के. रवि, भारत कदम यांनी पत्रकारितेतील आधिस्विकृती पत्रकारधारकांच्या जाचक अटी विषयी, पत्रकारांच्या फुटीरतेविषयी, त्यांच्या सुख सुविधांविषयी खंत व्यक्त करून पत्रकार विजय साखळकर यांचे पत्रकार क्षेत्रातले योगदान खूपच मोठे असल्याचे सांगितले.

[: ह्यावेळेस पत्रकार प्रा हेमंत सामंत, नासिकेत पानसरे, घनश्याम बडेकर ,सत्यवान तेटांबे , सुरेश गायकवाड सुधीर हेगिष्टे यांनी पत्रकार विजय साखळकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.: या कार्यकमाचे सूत्रसंचालन पत्रकार विजय साखळकर यांचे मानस पुत्र राजेंद्र साळसकर यांनी केले.

संबंधित पोस्ट

भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चित्ररथाच्या माध्यमातून संविधान प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबा आढाव यांचे संपूर्ण आयुष्य कष्टकरी, श्रमिक, गरीब, वंचित वर्गाकरिता समर्पित – उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; उपमुख्यमंत्र्यांकडून पार्थिवाचे अंत्यदर्शन

vishwatmaklokswamivarta

जनसामान्यप्रेमी आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या नेतृत्वातील जनता दरबारास ‘न भूतो न भविष्यती’ असा प्रतिसाद… 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने बँक खाते व्यवहारांवर राहणार करडी नजर*

vishwatmaklokswamivarta

महसूल सेवा पंधरवड्यानिमित्त, महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने नागरिक-केंद्रित सेवा आणि योजनांचा प्रचार करण्यासाठी एक विशेष मोहीम..

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी “अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान” या संकल्पनेला पुढे नेण्याची गरज -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ