vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

.०३ मार्च, २०२४ रोजी होणार “राष्ट्रीय लोकअदालत” चे आयोजन वाहतूक खटल्याबाबत विशेष Help Desk मोटार अपघात प्रकरणांबाबत तडजोडीसाठी मध्यस्थितांची नेमणूक

.०३ मार्च, २०२४ रोजी होणार “राष्ट्रीय लोकअदालत” चे आयोजन वाहतूक खटल्याबाबत विशेष Help Desk मोटार अपघात प्रकरणांबाबत तडजोडीसाठी मध्यस्थितांची नेमणूक

 

वैवाहिक प्रकरणे व धनादेशाबाबत N.I. Act u/s 138 च्या प्रकरणांना प्राधान्य

 

 

ठाणे, प्रतिनिधी :- मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे श्रीनिवास ब्रि. अग्रवाल, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे अंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालये तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, शाळा न्यायाधीकरण, ऋण वसुली न्यायाधीकरण (DRT) व इतर न्यायालयांमध्ये रविवार, दि.०३ मार्च, २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता “राष्ट्रीय लोकअदालत” चे आयोजन करण्यात आले आहे.

 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व मा. न्यायालयांमधील दिवाणी स्वरूपाची, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची प्रकरणे, वैवाहिक स्वरूपाची, N.I. Act u/s 138 (चेक संबंधीची) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसूली प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, कामगार विषयक वाद, भूसंपादन प्रकरणे, विज व पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूली प्रकरणे तसेच दावा दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

 

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रामुख्याने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदा, महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत, राष्ट्रीयकृत व खाजगी बँक इत्यादीं शासकीय, निमशासकीय संस्थाचा सक्रिय सहभाग असतो तसेच त्यांच्याकडून नागरीकांना लोकअदालतीच्यानुषंगाने थकित बील, थकीत लोन रक्कम प्रकरणांबाबत दावा दाखल पूर्व प्रकरणे नोंदवून त्यामध्ये लोकअदालत पॅनलच्या सहाय्याने तडजोड करण्याची व तडजोड अंतिम रक्कम भरण्याची सूवर्ण संधी दिली जाते.

 

वाहतूक खटल्यांबाबत Help Desk

 

ठाणे जिल्ह्यात वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याने असंख्य नागरीकांवर मोटार वाहन अधिनियमान्वये गुन्हे दाखल आहेत. अशी प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वाहतूक शाखेने पुढाकार घेतला असून त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वाहतूक शाखा, तीनहात नाका, ठाणे (प.) येथे Help Desk सुरु करण्यात आला आहे. हेल्प डेस्क मार्फत लोकअदालती विषयी व तडजोडपात्र गुन्ह्यांसंबंधी जनजागृती करण्यात येत असून हे हेल्प डेस्क वाहतूक शाखेमध्ये दि.१६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत कार्यरत असेल. तरी ज्या नागरिकांची मोटार वाहन कायद्यांतर्गत ई-चलान प्रकरणे प्रलंबित आहेत त्यांनी या कालावधीमध्ये वाहतूक शाखेशी संपर्क साधून दि.०३ मार्च २०२४ रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे सचिव ईश्वर कां. सूर्यवंशी आणि पोलीस उप आयुक्त डॉ. विनय राठोड यांनी केले आहे.

 

000000000000

संबंधित पोस्ट

हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांचा 350 वा शहीदी समागम-जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

vishwatmaklokswamivarta

सिल्लोड येथे ‘मुख्यमंत्रीःमाझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ*महिला सक्षमीकरणामुळेच देश महासत्ता होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

हनुमान जयंती निमित्त विशेष: सर्व देशवासियांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

बीबीसी (BBC) ही जगातील सर्वात ‘भारत बकवास कॉर्पोरेशन’ बनली आहे. भारतात कार्यरत असलेल्या कोणत्याही मीडिया संस्थेला देशातील नियम आणि नियमांचे पालन  करावे लागेल.गौरव भाटीया भाजप प्रवक्ते

vishwatmaklokswamivarta

पालिकेच्या शिपायांच्या घरावरही आता ते धाडी टाकतील,केंद्रीय तपास यंत्रणांना टोलाशिवसेना खासादर संजय राऊत .

vishwatmaklokswamivarta

दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta