vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

आयुष्यात सर्व कांही मिळते पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही,*

.*🌹ओम नमः शिवाय🌹* *🌹🙏प्रभात पुष्प🙏🌹**आयुष्यात सर्व कांही मिळते पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही,*

*आयुष्य संपत जाते शोध कार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्ष्यांत येते की जे बाहेर शोधत होतों ते तर माझ्याच जवळ होते‌‌…*

*सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पूर्ण करतो.. पण स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करु शकत नाही… म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा सौंदर्य नव्हे..!*

_*प्रार्थनेत मागितलेल्या गोष्टींची किंमत सर्वस्वापेक्षा अधिक असते.*_

_*प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत… एक तर देऊन जा, नाही तर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही.*_

*देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो…*

*त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो…*

*आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते…*

*तो सर्वांना दिसत असतो…*

*म्हणुन मंदीरातला देव एकवेळ टाळला तरी चालेल…*

*पण कर्मातला देव कधीही टाळु नका…!*

*दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची*

*माणसं तोडू नका कारण काडी टाकून आग लावणे*

*आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीत आहे.*

*लक्षात ठेवा एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून*

*काढायला खूप वेळ जातो कदाचित संपूर्ण आयुष्य*

*पायाला झालेली जखम,*

*जपून चालायला शिकवते,*

*आणि मनाला झालेली जखम,*

*आयुष्य जगायला शिकवते.*

*आयुष्यात आनंदी राहायचं असेल,*

*तर कोणालाही गरजेपेक्षा,*

*जास्त महत्त्व देऊ नका.*

*कारण…*

*तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता,*

*पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते.*

*💐शिवशंकर स्वामी इटोलीकर💐*

आज दिनांक १० फेब्रुवारी २०२४ शनिवार

*दिवस तुमचा आनंदात जावो हीच शनिदेव व बजरंग बली च्याचरणी प्रार्थना ..💐💐*

संबंधित पोस्ट

गुरुचरित्र ग्रंथाची ताकद….

vishwatmaklokswamivarta

श्रीदत्तमहाराजांची नावे आणि त्यांचा अर्थ

vishwatmaklokswamivarta

संत जो मार्ग सांगतात, तो उन्नत आणि सात्विक मार्गच असतो ..भावार्थ देखणे .

महाआरोग्य शिबिर- संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा २०२५-

vishwatmaklokswamivarta

वीरशैव लिंगायतांचे गोत्र आणि त्यांचे कुलदैवत वीरशैवांना पितृ पक्ष पिंड प्रधानातील.तर्पण आचरण नाही.*

अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे काय?*

vishwatmaklokswamivarta