vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. गड मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. गड मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

राज्य प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथील गड मंदिराला भेट दिली व प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. गड मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले

गोंदिया आणि नागपूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आज पूजा केली. त्यांनतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिराविषयीची माहिती त्यांना देण्यात आली. गड मंदिराच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही यासाठी पाठपुरावा करावा, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी खासदार कृपाल तुमाने,आमदार ॲड.आशिष जयस्वाल, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत आदी उपस्थित होते. रामटेक येथे प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या टेकडीवर श्रीराम मंदिर उभारण्यात आले असून गडमंदिर अशी मंदिराची ओळख आहे.

 

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे सुरु होणार राज्यातील दुसरी चित्रनगरी; चित्रपट-मालिका निर्मिती, पर्यटनासह रोजगाराला मिळणार …

बॉलिवूडची करीना कपूर च्या दुसऱ्या मुलाच्या नावावरून चांगलीच चर्चेत,मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्याने ट्रोल.

लोकसभा निवडणूक निकाल जाहीर:काँग्रेस १३, भाजप ९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८, शिवसेना ७, राष्ट्रवादी काँग्रेस १, अपक्ष १ उमेदवार विजयी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचे अभिनंदन 

vishwatmaklokswamivarta

पर्यटनातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्याची संधी– मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे

कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस लढवणार, पक्षाकडून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर; नाना पटोले काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष

vishwatmaklokswamivarta