vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बॉलिवूडची करीना कपूर च्या दुसऱ्या मुलाच्या नावावरून चांगलीच चर्चेत,मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्याने ट्रोल.

मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्याने ट्रोल झालेल्या करीना कपूरने अखेर मौन सोडलं, म्हणाली “जरा विचार करा…”

दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा सैफ आणि करीनाला ट्रोल केलं.

मुंबई प्रतिनिधी,बॉलिवूडची बेबो करीना कपूर सध्या तिच्या दुसऱ्या मुलाच्या नावावरून चांगलीच चर्चेत आली आहे. करीना कपूरने तिच्या ‘प्रेग्नेंसी बायबल’ या पुस्तकात दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याचा खुलासा केलाय. करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर असल्याचं कळताच सोशल मीडियावर पुन्हा एकदा या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली.

या आधी करीना आणि सैफने दुसऱ्या मुलाचं नाव ‘जेह’ ठेवल्याचं वृत्त समोर आलं होतं. जेह या नावावर कुणीही हरकत घेतली नसली तरी सैफिनाच्या मुलाचं खरं नाव जहांगीर असल्याचं कळताच नेटकऱ्यांनी करीनावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. यावर आता करीना कपूरने अखेर तिचं मौन सौडलंय. इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत करीना म्हणाली, “मी एक पॉझिटिव्ह व्यक्ती आहे. नकारात्मकतेकडे मी लक्ष देत नाही. कोव्हिडने सगळ्यांना जवळ आणलं आपण या बद्दल विचार करायला हवा. राहिला प्रश्न ट्रोलर्सचा तर त्यांना हाताळण्यासाठी मला ध्यान करावं लागेल. आपण दोन लहान निरागस मुलांबद्दल बोलतोय याचा जरा विचार करा.” असं करीना म्हणाली.

करीना कपूर आणि सैफ अली खानने त्यांच्या पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तर या नावामुळे करीना आणि सैफला ट्रोलही करण्यात आलं होतं. सैफ करीनाने भारतावर आक्रमण करणाऱ्या क्रूर तैमूर या प्रशासकाचं नाव का ठेवलं असं म्हणत नेटकऱ्यांनी सैफिनावर निशाणा साधला होता. त्यानंतर दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा सैफ आणि करीनाला ट्रोल केलं.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार जाहीर महाराष्ट्र ठरला सहा पद्मभूषण तर सहा पद्मश्रींचा मानकरी

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोकण विभागीय आयुक्तांनी कार्यक्रमस्थळी केली पाहणी…

नवी मुंबई :मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेची नवी मुंबईत प्रभावी अंमलबजावणी111 प्रभागांतील मदत केंद्रे तसेच 226 अंगणवाड्यांमध्ये अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध

महामार्गावरील खड्डे 15 ऑगस्ट पर्यंत न बुजवल्यास गुन्हे दाखल करणार* *- पालकमंत्री शंभूराज देसाई*

क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्राची मोठी हानी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरुच; राजू शेट्टी आज आंदाेलनाची पुढची दिशा स्पष्ट करणार

vishwatmaklokswamivarta