vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्राची मोठी हानी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्राची मोठी हानी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबई, प्रतिनिधी: क्रीडा समीक्षणात साहित्यविश्वाचे सौंदर्य ओतून आपल्या ओघवत्या कथनशैलीमुळे क्रीडाक्षेत्राची आवड मनामनांत पेरणारे प्रसिद्ध समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनामुळे मराठीच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

आपल्या शोक संदेशात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, द्वारकानाथ संझगिरी हे साक्षेपी साहित्यिक, पत्रकार, स्तंभलेखक आणि चित्रवाणी कार्यक्रमांचे निर्माते अशा विविध क्षेत्रांत ठसा उमटविणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने एका मिश्किल आणि खुमासदार शैलीच्या क्रीडा पत्रकाराला महाराष्ट्र मुकला आहे.

उत्कृष्ट पत्रकारिता, लेखनशैली, समीक्षा अशा अनेक गुणांनी संपन्न असलेल्या संझगिरी यांनी मराठी, इंग्रजी आदी भाषांतील लेखनातून वाचकांशी साधलेल्या संवादाचा धागा तुटला आहे. त्यांच्या असंख्य पुस्तकांनी मराठी वाचकांना आनंद दिला आणि त्यांचे अनुभवविश्व समृद्ध केले. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

योगाभ्यासातून शिक्षित, सुसंस्कृत व स्वस्थ नागरिक घडविणे आजची गरज – जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे प्रतिपादन  > बुलढाण्यात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा > २५०० योगप्रेमींचा सहभाग 

जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकअदालतीचे दि.22 मार्च रोजी आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील वांद्रे ते कुर्ला #पॉडटॅक्सी चा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक-आसामप्रमाणे संपूर्ण देशात ‘बहुपत्नी विवाहा’वर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

vishwatmaklokswamivarta

​जनगणना २०२७: बुलढाणा जिल्ह्यात तयारीला वेग; डिजिटल जनगणनेसाठी क्षेत्रिय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण संपन्न*