vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आताची मोठी बातमी: मुंबईतील सायन कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांचा 25 इमारतीचा पुनर्विकास म्हाडा मार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नेमणू करणार…

आताची मोठी बातमी: मुंबईतील सायन कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांचा 25 इमारतीचा पुनर्विकास म्हाडा मार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नेमणू करणार…

 

(सायन कोळीवाडातील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा पुनर्विकास)

मुंबई प्रतिनिधी सायन कोळीवाडातील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवाशांना स्वत:चे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी गुरु तेग बहादूर नगर सहकारी संस्था स्थापन करण्यात आली असून या ठिकाणी ४१ हजार ५०० चौ. मीटर क्षेत्रावर २५ इमारती व त्यात १२०० सदनिका होत्या. या इमारती पाडून टाकण्यात आल्या आहे. मात्र रहिवाशांच्या व्यतिरिक्त उर्वरित जमिनीवर व्यावसायिक झोपड्यांचे अतिक्रमण आहे.

म्हाडामार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नेमून या जमिनीवरील इमारतींचा पुनर्विकास करण्यात येईल. यासाठी म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या पुनर्विकासासाठी प्रत्येक इमारतीतील किमान ५१ टक्के किंवा पुनर्वसन योजनेमधील एकूण भाडेकरु किंवा रहिवाशांच्या किमान ६० टक्के भाडेकरुंची सहमती आवश्यक आहे. या संदर्भात गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अधिक्षतेखाली उच्चाधिकार समिती हा प्रकल्प राबविण्यावर संनियंत्रण ठेवेल.

—-

संबंधित पोस्ट

विधानपरिषद प्रश्नोत्तरे :बांधकामापूर्वी रक्कम अदा केल्याप्रकरणी शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंत्याचे निलंबन- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नाताळच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट “महादेवा”**महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न*

vishwatmaklokswamivarta

आज नारी शक्तीचा सन्मान, देशातील महिलांचं सक्षमीकरण करणं आजच्या यात्रेचं उद्देश भारत जोडो यात्रा राहुल गांधी

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी* *इंग्लिश करण्यावर भर* *- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे* 

पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दिंडोरी तालुक्यातील जानोरी, कोरटे परिसरातील नुकसानीची केली पाहणी

vishwatmaklokswamivarta