vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दिंडोरी तालुक्यातील जानोरी, कोरटे परिसरातील नुकसानीची केली पाहणी

पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन-दिंडोरी तालुक्यातील जानोरी, कोरटे परिसरातील नुकसानीची केली पाहणी…

नाशिक, प्रतिनिधी: जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी दिंडोरी तालुक्यातील जानोरी, कोरटे परिसराला भेट देत सततच्या पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी नानाजी भोये, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आदी उपस्थित होते.मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले की, सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशा वेळेस राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पिकांच्या नुकसानाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत शेतक-यांच्या खाती जमा करण्यात आली आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहेत. लवकरच नुकसानीचा अहवाल प्राप्त होणार असून सदरचा अहवाल तातडीने शासनास सादर करण्यात येईल. यावेळी शेतकरी रामराव दवणे, लक्ष्मीबाई कदम यांनी शेत पिकांच्या झालेल्या नुकसानाची माहिती मंत्री महाजन यांच्यासह अधिकाऱ्यांना दिली.

0000

संबंधित पोस्ट

आपलं मंत्रालय’ विशेषांकाचे प्रकाशन

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात २९० पदांची भरती;कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १४४ पदांसह विविध जागा

vishwatmaklokswamivarta

अंबड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न     महाराजस्व समाधान शिबिरास आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची प्रमुख उपस्थिती  • 78 भिल्ल कुटुंबांना घराचे पट्टेचे वितरण

सैनिक कल्याण सेवा आता ऑनलाईन;नावनोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील नव्याने वसाहती निर्माण झालेला मुजुमदार पार्क परिसरात कागल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे स्वच्छता अभियान..

१२ हजार दुध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी रुपयांचे अनुदान थेट जमा

vishwatmaklokswamivarta