vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या मध केंद्र, मधमाशापालन व अन्य योजनांविषयीच्या जनजागृती शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या मध केंद्र, मधमाशापालन व अन्य योजनांविषयीच्या जनजागृती शिबिराचे आयोजन

 

 

 

ठाणे, प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत कार्यान्वित झालेल्या मध केंद्र योजना, मधमाशापालन योजनेंतर्गत महिला, युवक-युवती, सुशिक्षित बेरोजगार, आदिवासी, ज्येष्ठ नागरीक, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जमाती, स्वातंत्र्य सैनिक, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, स्वयंसहाय्यता युवा गट, शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन पांरपारिक कारागीर इ. समाजातील सर्व घटकांना मध योजनेचा लाभ देण्यात येतो. याशिवाय महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना इ. योजना राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत उद्योजकांना विविध उद्योग उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच अनुदानाचा लाभ देण्यात येतो. मध योजनेंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना विनाशुल्क निवासी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था मंडळामार्फत करण्यात येते.

 

या योजनांची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी, यासाठी दि. 15 फेब्रुवारी 2024 रोजी एक दिवसीय जनजागृती शिबिराचे आयोजन मु.पो. गणेशपुरी, ता-भिवंडी येथे आयोजित करण्यात आले असून या शिबिराची वेळ सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 अशी असणार आहे. या शिबिरामध्ये शासनाच्या कृषी विभाग, वन विभाग, पंचायत समित्ती इ. शासकीय कार्यालयाचा सहभाग राहणार आहे. या शिबिरात प्रवेश नि:शुल्क आहे. या विविध शासकीय योजनांचे लाभ घेऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांची नाव-नोंदणी करुन त्यांचे अर्ज शिबिरामध्ये भरुन घेण्यात येणार आहे.

 

तरी या शिबिरात इच्छुक नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, ठाणे यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

जिल्हास्तर युवा महोत्सवातील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याकरितायुवक-युवतींनी तसेच युवा मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करावी

vishwatmaklokswamivarta

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन अजून सहा दिवस तुरुंगातच घालवावे लागणार; NDPS कोर्ट 20 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी

vishwatmaklokswamivarta

2023 शैक्षणिक वर्षापासून MBBS सह वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेतूनही घेण्याचा पर्याय!

vishwatmaklokswamivarta

मालाडजवळील रणांगल बीच जवळ मच्छिमार समाजाचे स्मशानभूमी पाडल्याप्रकरणी मुंबई हायकोर्ट कडून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना समन्स…

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !**महिलांच्या सक्षमीकरणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेतर्फे राज्यभरात ‘शस्त्रपूजन’ आणि ‘शौर्यजागृती’ उपक्रम**लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची युवतींची लोकप्रतिनिधींकडे मागणी !*

ओमिक्रॉनचा धोका वाढला, केंद्र सरकारचा महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय….

vishwatmaklokswamivarta