vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे१ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे१ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

 

            मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या ११ वर्षे मुदतीच्या १ हजार ५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री २० फेब्रुवारी २०२४ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

 

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २० फेब्रुवारी २०२४ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीडस् संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

 

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २१ फेब्रुवारी २०२४ रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

 

कर्जरोख्याचा कालावधी ११ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २१ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २१ फेब्रुवारी २०३५ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दरशेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी २१ ऑगस्ट आणि २१ फेब्रुवारी रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

 

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

 

००००

संबंधित पोस्ट

कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख दस्ताऐवज २४ नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर यांची निवड

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते व पूल बांधणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल: आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

जिजाऊ माँसाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री भरत गोगावले पाचाड येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ४२६ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि 136 कृत्रिम विसर्जन स्थळे याठिकाणी दीड दिवसांच्या श्रीगणेश मूर्तींचा विसर्जन सोहळा

vishwatmaklokswamivarta