vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिजाऊ माँसाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री भरत गोगावले पाचाड येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ४२६ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

जिजाऊ माँसाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री भरत गोगावले ,पाचाड येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ४२६ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा..

रायगड प्रतिनिधी-स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड परिसर हा पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित येत असून त्यांच्या नियमाखाली सर्व प्रशासन काम करीत आहे. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने रायगडची विकासात्मक कामे चालू आहेत त्याच धर्तीवर राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वाडा हा जुन्या पद्धतीने बांधून त्याचे संवर्धन करण्याचा विचार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांनी केले.

रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रl राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या ४२६ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन पाचाड येथील समाधीस्थळी करण्यात आले होते. यावेळी श्री. गोगावले यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन,अभिषेक व महाआरती करण्यात आली. याप्रसंगी पंचायत समिती महाड गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, पाचाड सरपंच सीमा बेंदुगडे,यांसह विविध अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.या जन्मोत्सव सोहळ्याला विविध शिवभक्त संघटनेचे सदस्य, शेकडो शिवभक्त आणि पाचाड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जून ते ऑगस्टदरम्यान देशातील एकूण पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. 

पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय: जालना येथे विशेष प्रशिक्षण शिबिर संपन्न! 🤝🚔

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी जोरात! 🗳️मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावी;जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण सुधारित कार्यक्रम जाहीरसांगली जिल्ह्यात 93.98 टक्के मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- बीएलओमार्फत घरोघरी भेटीचा कार्यक्रम 17 ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार- नागरिकांना मतदार यादीतील माहिती अचूक राहण्यासाठी बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन

महसुलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ· माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण..

vishwatmaklokswamivarta