vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

म्हसळा शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

म्हसळा शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

 

 

 

राज्य प्रतिनिधी) :- महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत म्हसळा शहरासाठी रु.43 कोटी इतक्या रकमेच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली असून म्हसळा नगर पंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीच्या नागरिकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, यासाठी म्हसळा शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले.

 

म्हसळा येथे आयोजित कार्यक्रमासाठी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, खासदर सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड उपस्थित होते.

 

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या प्रकल्पामुळे म्हसळा नगर पंचायत हद्दीतील नागरिकांना मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे. खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या प्रकल्पाच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शान पावन झालेल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्याला युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा आणि शाहुफुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. म्हसळा तालुक्यातील विकास कामांसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 

शासनाच्या योजनांचा जनतेला जास्तीत जास्त फायदा कसा होईल, राज्यशासनामार्फत यावर विशेष भर दिला जात आहे. यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाची माहिती दिली. शेतकऱ्यांना पीक विमा, आर्थिक सहाय्य, शेतीसाठी 0 टक्के व्याजाने कर्ज पुरवठा, वीज, पाणी, रस्ते विकासासाठी शासनाकडून महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. तसेच राज्यातील महिला आणि मुलींचा मान सन्मान वाढविणे, 8 लक्ष रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत उच्च व तंत्र शिक्षण घेता यावे, यासाठी शासनाने महत्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे असेही श्री.पवार यांनी सांगितले.

 

खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, म्हसळा तालुक्यातील मोठमोठ्या विकास कामांसाठी निधीची उपलब्धता करून दिल्यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळाली असून पर्यटकांची संख्या चार ते पाच पटीने वाढली आहे. येत्या वर्षभरात या प्रकल्पाच्या कामाचे उद्घाटन होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी म्हसळा शहराला पाणीपुरवठा योजनेसाठी 43 कोटी रुपये मंजूर झाले असल्यामुळे त्यांचे आभार मानले तसेच म्हसळा तालुक्यात नगर पंचायत कार्यालय आणि तहसिलदार प्रशासकीय इमारत बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

संबंधित पोस्ट

डोंबिवलीत खाकीला काळिमा फासणारी घटना, पोलीस हवालदाराने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग.

पंचगंगेचे प्रदूषण करणारा कत्तलखाना 15 दिवसांत बंद झाला नाही, तर नागरिक बंद पाडतील ! – ‘कत्तलखाना हटाव-पंचगंगा बचाव’ मोर्चाद्वारे हिंदुत्वनिष्ठांची चेतावणी

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी : इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या देशभरातल्या कार्यालयांवर आज एनआयए आणि ईडीने छापे सुरू .यात 107 जणांना अटक.

vishwatmaklokswamivarta

राज्यातील तरूणांना कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे रोजगार देणार– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे• अहमदनगर येथे विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिर

vishwatmaklokswamivarta

औरंगाबादमध्ये सिडको परिसरात ब्रिटिशकालीन नाणी सापडल्याचीच चर्चा,औरंगाबादचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत…

vishwatmaklokswamivarta

आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा – राज्यपाल सी पी राधाकृष्णन एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत राजभवन येथे सिक्कीम राज्य स्थापना दिवस