vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

डोंबिवलीत खाकीला काळिमा फासणारी घटना, पोलीस हवालदाराने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग.

डोंबिवलीत खाकीला काळिमा फासणारी घटना, पोलीस हवालदाराने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग..

[ प्रतिनिधी  : डोंबिवली राम नगर पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदारानेच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या पोलीस हवलदाराला अटक करण्यात आली आहे. ज्या रामनगर पोलीस ठाण्यात तो कार्यरत होता त्याच पोलीस ठाण्याने त्याला अटक केली आहे .सतीश कारले असे या पोलीस हवलदाराचं नाव असून त्याच निलंबन करण्यात आलं आहे. या घटनेमुळे कल्याण डोंबिवलीत एकच खळबल उडाली आहे.

डोंबिवलीत राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीने तिच्या इमारत राहणारे सतीश कारले या पोलिस हवलदाराने इमारतीमधील जिन्यातच छेडछाड करत गैरवर्तन केल्याचा आरोप केला. त्या तरुणीने ही सगळी बाब तिच्या कुटुंबियांना सांगितली. सदर पीडित अल्पवयीन तरुणीने या प्रकरणी डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्यात 354 प्रमाणे सतीश कार्ले विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.

सतीश हा रामनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होता. याबाबत रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांनी तक्रार आल्यावर आम्ही त्याला अटक करुन त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालायने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याचं सांगितले . कल्याणचे पोलिस उपायुक्तांनी सतिशच्या विरोधात निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला आहे.

संबंधित पोस्ट

मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या विक्रीला उत्साहात सुरुवातप्रदर्शन आणि विक्री 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान सुरू राहणार

छत्तीसगड मधल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत २ नक्षलवादी ठार, नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त.

vishwatmaklokswamivarta

26 सप्टेंबरला घटस्थापनेपासून 4 ऑक्टोबर पर्यंत नऊ रात्रींचे नऊ रंग कोणते?

vishwatmaklokswamivarta

शालेय गुणवत्तेचा आराखडा अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे राबवावा – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबईतील लोकल रेल्वे ने प्रवास करणाऱ्या  नागरिकांची दोन डोस घेतलेल्यांना लोकल तिकीट देण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta

गारपीट, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• वादळी वारे, विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta