
लिडकॉम आपल्या दारी अंतर्गत कार्यशाळेचे आयोजनचर्मकार समाजातील बांधवांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा
रायगड, प्रतिनिधी:- जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली दि.22 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हा कार्यालय, रायगड करिता लिडकॉम आपल्या दारी अंतर्गत आर.डी.सी.सी.बँक मुख्य कार्यालय, 3 रा मजला, निलिमा हॉटेल शेजारी, चेंढरे, अलिबाग येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) बांधवांनी या कार्यशाळेमध्ये उपस्थित राहून महामंडळाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपली सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगती साध्य करून आपला सामाजिक स्तर उंचवावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रविण के.जाहीर यांनी केले
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित हे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असून हे महामंडळ सुवर्ण जयंती वर्षात पदार्पण करीत असल्याने महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती रायगड जिल्ह्यामधील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) बांधवांना अवगत व्हावी, या उद्देशाने तसेच एम.सी.ई.डी.मार्फत देण्यात येणाऱ्या उद्योजकता विकास प्रशिक्षण संबंधी अर्जदार नोंदणी व प्रशिक्षणाची विस्तृत माहिती या कार्यशाळेत दिली जाणार आहे. हा कार्यक्रम उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे.
0000000
वृत्त क्रमांक :-127



